IMPIMP

ACB Trap News | 20 हजाराच्या लाच प्रकरणी कोपरगावच्या तहसीलदारासह खाजगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
ACB Trap News | 20,000 bribe case, Kopargaon tehsildar along with private person in anti-corruption net

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | वाळू वाहतूकीच्या गाडीवर कारवाई न करण्यासाठी 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करून लाच घेतल्याप्रकरणी अ‍ॅन्टी करप्शन विभागाच्या पथकाने (Anti Corruption Bureau Maharashtra) खाजगी व्यक्तीस रंगेहाथ पकडले आहे (Ahmednagar ACB Trap). लाच घेण्यास प्रोत्साहन दिले म्हणून तहसीलदारावर देखील गुन्हा (FIR On Tahsildar) दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

कोपरगावचे तहसीलदार विजय जबाजी बोरूडे Vijay Jabaji Borude (रा. शासकीय निवासस्थान कोपरगाव, जि. अहमदनगर) आणि खाजगी व्यक्ती गुरमीत सिंग दडियल Gurmeet Singh Dadial (40, रा. कोपरगाव, जि. अहमदनगर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Ahmednagar Bribe Case). याप्रकरणी गुरमीत दडियल याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे (Ahmednagar Crime News). याबाबतची अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांचे वाळू वाहतूकीचे गाडीवर कारवाई न करण्याकरिता गुरमीत सिंग दडियल याने कोपरगावचे तहसीलदार विजय जबाजी बोरूडे यांच्याकरिता 20 हजार रूपयाच्या लाचेची मागणी केली. तसेच लाच घेण्याचे मान्य केले होते. (ACB Trap News)

लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाकडे दि. 17 मे 2023 रोजी तक्रार दाखल केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दि. 19 मे 2023 रोजी अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला असता सरकारी पंचासमक्ष गुरमीत सिंग दडियल याने 20 हजार रूपये लाच म्हणून घेतले. त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. दरम्यान, तहसीलदार बोरूडे आणि गुरमीत दडियल यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अप्पर पोलिस अधीक्षक नारायण न्याहाळदे (Addl SP Narayan Nyahalde), पोलिस उप अधीक्षक नरेंद्र पवार
(DySP Narendra Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक वैशाली पाटील (DySP Vaishali Patil) ,
पोलिस हवालदार पंकज पळशीकर, पोलिस नाईक नितीन कराड, पोलिस नाईक प्रवीण महाजन,
पोलिस नाईक प्रभाकर गवळी आणि चालक पोलिस संतोष गांगुर्डे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : ACB Trap News | 20,000 bribe case, Kopargaon tehsildar along with private person in anti-corruption net

Related Posts