IMPIMP

Pune LokSabha Bypoll Election | पुणे लोकसभेची पोटनिवडणूक ‘या’ तारखेच्या आत होणे अपेक्षित, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Pune LokSabha Bypoll Election | Pune Lok Sabha by-election is expected to be held within ‘this’ date, know in detail

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune LokSabha Bypoll Election | पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट (BJP MP Girish Bapat) यांच्या निधनामुळे या लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. (Pune LokSabha Bypoll Election) या रिक्त जागेसाठी लवकरात लवकर पोटनिवडणूक घ्यावी असे नागरिकांचे जरी मत असले तरी मे महिना संपत आला तरी निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

गिरीश बापट यांचे २९ मार्चला निधन झाल्यामुळे येत्या २९ सप्टेंबर पर्यंत पोटनिवडणूक (Pune LokSabha Bypoll Election) होणे अपेक्षित आहे. लोकप्रतिनिधी कायद्यातील 151 (ए) अन्वये लोकसभा (Lok Sabha) अथवा विधानसभेची (Assembly) जागा कोणत्याही कारणाने रिक्त झाली तर सहा महिन्यांच्या आत या जागेसाठी पोटनिवडणूक घेता येते. मात्र आता जर पोटनिवडणूक लागली तरी ती ऐन पावसाळ्यात व सणासुदीला लागण्याची शक्यता आहे.

सध्या पुणे आणि केरळमधील वायनाड (Wayanad) या दोन जागा रिक्त आहेत. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना खासदार म्हणून अपात्र ठरविण्यात आल्यामुळे ही जागा रिकामी आहे. यामुळे या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक घेणे गरजेचे आहे. पुणे मतदारसंघाची पोटनिवडणूक मे अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण मे महिना संपत आला तरीही पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला नाही. कसबा विधानसभा मतदार संघातील पराभवामुळे सत्ताधारी भाजप (BJP) पोटनिवडणुकीसाठी उत्साही दिसत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

 

पावसाळ्याच्या दिवसात व सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून निवडणुका शक्यतो
घेतल्या जात नाहीत. लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार रिक्त जागेचा कालावधी संपण्यास एक वर्षापेक्षा
कमी शिल्लक असल्यास पोटनिवडणूक टाळता येते. पुण्याची जागा मार्चअखेर रिक्त झाली असल्याने एक
वर्षाच्या मुदतीचा नियम येथे लागू होत नाही. पण केंद्र सरकारच्या (Central Government) सल्लामसलतीमध्ये
पोटनिवडणूक घेणे शक्य नसल्याचा अभिप्राय प्राप्त झाला तरी निवडणूक आयोगाला (Election Commission) पोटनिवडणूक लांबणीवर टाकता येते.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

विद्यमान लोकसभेची मुदत १६ जून रोजी संपत असली तरी एप्रिल-मेमध्ये टप्प्याटप्प्याने मतदान होईल.
यामुळे नव्या खासदाराला साधारणत: सहा-सात महिन्यांचा कालावधी मिळू शकेल. गणेशोत्सव सप्टेंबरच्या
दुसऱ्या आठवड्यात सुरू होत असल्याने पुणे लोकसभा मतदारसंघाची (Pune Lok Sabha Byelection)
पोटनिवडणूक प्रक्रिया त्यापूर्वी पूर्ण करावी लागेल. व निवडणुक लागली तरी तिच्यावर पावसाचे सावट राहिल.

Web Title : Pune LokSabha Bypoll Election | Pune Lok Sabha by-election is expected to be held
within ‘this’ date, know in detail

Related Posts