IMPIMP

ACB Trap News | 2.50 लाख रुपये लाच घेताना वन परिमंडळ अधिकारी व खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या ताब्यात

by nagesh
ACB Trap News | Anti-corruption arrest of Forest Circle officer and private person while taking Rs 2.50 lakh bribe

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | जमिनीवर वाढीव बांधकाम केल्यामुळे कारवाई न करण्यासाठी 5 लाखांची लाच मागून अडीच लाखाचा पहिला हप्ता स्वीकारताना (Accepting Bribe) वसई तालुक्यातील मांडवी येथील वन परिमंडळ अधिकारी (वनपाल) आणि एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau (ACB) Maharashtra) रंगेहाथ पकडले. आरोपींवर मांडवी पोलिस ठाणे (Mandvi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे एसीबीच्या (Thane ACB) पथकाने ही कारवाई (ACB Trap News) बुधवारी (दि.17) केली.

वन परिमंडळ अधिकारी Forest Circle Officer (वनपाल) रज्जाक रशिद मन्सुरी Razzak Rashid Mansuri (वय 51), खासगी व्यक्ती दानियाल हाजी खान Daniyal Haji Khan (वय- 52 रा. खानिवली ता.वाडा जि. पालघर) असे लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 50 वर्षाच्या व्यक्तीने मंगळवारी (दि.16) ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB Trap News) तक्रार दिली होती.

तक्रारदार यांनी त्यांच्या जमिनीवर वाढीव बांधकाम केले आहे. यामुळे त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी वनपाल रज्जाक मन्सुरी याने दानियाल खान मार्फत तक्रारदार यांच्याकडे 5 लाख रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबीकडे याबाबत तक्रार केली. ठाणे एसीबीच्या पथकाने बुधवारी पंचासमक्ष पडताळणी केळी असता रज्जाक मन्सुरी याने दानियाल खान मार्फत तक्रारदार यांचे कडे 5 लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

 

तसेच 5 लाख रुपयांपैकी अडीच लाख रुपये खान यांच्याकडे देण्यास सांगितले.
खान याने तक्रारदार यांच्याकडून 2 लाख 50 हजार रुपये लाच घेऊन ती रक्कम रज्जाक मन्सुरी याला दिली.
त्यावेळी दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी दोघांना रंगेहाथ पकडले.
त्यांच्यावर मांडवी पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायदा (Prevention of Corruption Act) कलम 7(अ),12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे (SP Sunil Lokhande),
अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर (Addl SP Anil Gherdikar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अश्विनी संतोष पाटील (DySP Ashwini Santosh Patil),
पोलीस अंमलदार महाडिक, पाटील, मदने, घोलप, चौधरी यांच्या पथकाने केली.

 

Web Title : ACB Trap News | Anti-corruption arrest of Forest Circle officer and private person while
taking Rs 2.50 lakh bribe

PMRDA News | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरण : 1 हजार 926 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मान्यता

Lok Sabha Election 2024 | राष्ट्रवादीचं मिशन लोकसभा, विभागवार नेत्यांना दिली जबाबदारी; पुणे विभागाची जबाबदारी ‘या’ तरुण नेत्यावर

Related Posts