IMPIMP

Pune Police MCOCA Action | पर्वती भागात दहशत माजविणाऱ्या बिपीन मापारी व त्याच्या इतर 3 साथीदारांवर ‘मोक्का’! पोलिस आयुक्तांकडून आतापर्यंत 45 संघटित गुन्हेगारी टोळयांवर MCOCA

by sachinsitapure
Pune Police MCOCA Action | 'MCOCA' on Bipin Mapari and his other 3 companions who are terrorizing mountain areas mcoca on 45 organized crime gangs so far by commissioner of police

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – पर्वती परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार बिपीन मापारी व त्याच्या इतर तीन साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई MCOCA (Mokka Action) केली आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी आतापर्यंत 45 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर (MCOCA On Organised Gangs In Pune) मोक्का कायद्यान्वये कारवाई केली आहे. (Pune Police MCOCA Action)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

फिर्यादी मित्रासोबत फोनवर बोलत असताना आरोपींनी त्याला हटकले. स्वप्निल उर्फ बाबा जगताप याच्याकडे रागाने का बघत असतो, तो आमचा मित्र आहे, तुला खुप माज आला आहे का असे म्हणुन तरुणावर धारदार हत्याराने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न (Attempt to Kill) केला. याप्रकरणी आरोपींवर पर्वती (दत्तवाडी) पोलीस ठाण्यात (Parvati (Dattawadi) Police Station) आयपीसी 307, 326, 323, 504, 34 आर्म अॅक्ट (Arm Act), महाराष्ट्र पोलीस अॅक्ट (Maharashtra Police Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Police MCOCA Action)

याप्रकरणी टोळी प्रमुख बिपीन मिलिंद मापारी (वय 24), त्रषिकेश ऊर्फ भावडया बबन धिवार (वय 21), निरज सुनिल खंडागळे (वय 20), विशाल ऊर्फ दौलत पिराजी आगम (वय 34 सर्व रा. दत्तवाडी) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपी बिपीन मिलिंद मापारी याच्याविरुध्द 7 गुन्हे आणि ऋषिकेश धिवार याच्यावर 5 गुन्हे दाखल आहेत. त्यांनी बेकायदेशीर मार्गाने हिंसाचाराचा वापर करून नागरिकांना धमकाविले. जुलुम जबरदस्ती करून लुटमार केली. वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई (Preventive Action) करुनही त्यांनी पुन्हा गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. मागील 10 वर्षात टोळीने खूनाचा प्रयत्न, घातक हत्यारांनी जबर दुखापत, बेकायदेशीर जमाव जमवणे, बेकायदेशीररित्या शस्त्र जवळ बाळगणे असे गुन्हे केले आहेत.

पर्वती पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3 (1)(ii),
3(2), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे (Sr PI Jayram Paygude) यांनी
पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma) यांच्या मार्फत अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक
विभाग प्रविणकुमार पाटील (IPS Pravin Kumar Patil) यांच्याकडे सादर केला होता. या अर्जाची छाननी करुन अपर
पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली. पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त अप्पासाहेब शेवाळे (ACP Appasaheb Shewale) करीत आहेत.

ही कामगिरी आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 सुहेल शर्मा,
सहायक पोलीस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे,
पोलीस निरीक्षक गुन्हे विजय खोमणे (PI Vijay Khomane), उप निरीक्षक जगदाळे (PSI Jagdale),
पोलीस अंमलदार दिपक लोधा, महेश चौगुले, गोरख मादगुडे यांनी केली.

Web Title :  Pune Police MCOCA Action | ‘MCOCA’ on Bipin Mapari and his other 3 companions who are terrorizing mountain areas mcoca on 45 organized crime gangs so far by commissioner of police

Related Posts