IMPIMP

NCP MLA Nawab Malik | मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी मंत्री नवाब मलिक यांना जामीन मंजूर

by sachinsitapure
NCP MLA Nawab Malik | supreme court grants bail to former maharashtra minister nawab malik

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक (NCP MLA Nawab Malik) यांना वैद्यकीय कारणास्तव (Medical Reasons) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर (Bail Granted) केला आहे. वैद्यकीय कारणास्तव जामीन देण्यास ईडीने (ED) हरकत घेतली नाही. फेब्रुवारी 2022 मध्ये नवाब मलिक (NCP MLA Nawab Malik) यांना अटक झाली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

 

नवाब मलिक यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक (Arrest) करण्यात आली होती.
मुंबईतील कुर्ला येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर
आरोप आहेत. मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर (Iqbal Kaskar) याच्या चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं.

23 फेब्रुवारी 2022 रोजी नवाब मलिकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याआधी 8 तास त्यांची चौकशी करण्यात आली होती.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) रिअल इस्टेटच्या (Real Estate) माध्यमातून टेरर फंडिंग
(Terror Funding) करतो आणि रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून केले जातात.
यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने (ED) धाडसत्र राबवले होतं.

Web Title :  NCP MLA Nawab Malik | supreme court grants bail to former maharashtra minister nawab malik

Related Posts