IMPIMP

ACB Trap News | वाळू वाहतूकीचा हप्ता म्हणून 10 हजाराची लाच घेणार्‍या महिला तलाठ्यासह खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

by nagesh
ACB Trap News | Chhatrapati Sambhajinagar Bribe Case Talathi Sayali Rajendra Vitekar Sudhakar Nalawade ACB Trap

छत्रपती संभाजीनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap News | वाळू वाहतूकीचा हप्ता म्हणून 10 हजार रूपयाची लाच घेतल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) येथील अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने (Anti Corruption Bureau) महिला तलाठ्यासह एका खासगी व्यक्तीला अटक केली आहे. (ACB Trap News)

सायली राजेंद्र विटेकर Sayali Rajendra Vitekar (31, पद – तलाठी, रा. सिडको एन-8, छत्रपती संभाजीनगर) आणि सुधाकर नलावडे Sudhakar Nalawade (रा. शेखपूर, ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्याची नावे आहेत (Chhatrapati Sambhajinagar ACB Trap). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांना 2 टॅक्टरने अवैधरित्या वाळूची वाहतूक करू देण्यासाठी प्रत्येकी एका ट्रॅक्टरचा 5 हजार रूपये हप्ता त्याप्रमाणे 2 टॅक्टरचे 10 हजार रूपये द्या अशी मागणी तलाठी सायली राजेंद्र विटेकर यांनी केली. सुधाकर नलावडेने सरकारी पंचासमक्ष 10 हजार रूपये लाच घेतली. त्या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांना अटक करून त्यांच्याविरूध्द खुलताबाद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB Trap News)

छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप आटोळे (ACB SP Sandeep Atole), अप्पर पोलिस अधीक्षक विशाल खांबे (Addl SP Vishal Khambe) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक किरण बिडवे (DySP Kiran Bidve), पोलिस हवालदार जमदाडे,
पोलिस हवालदार घायवत, पोलिस अंमलदार देठे आणि पोलिस शिपाई बुजाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Web Title : ACB Trap News | Chhatrapati Sambhajinagar Bribe Case Talathi Sayali Rajendra Vitekar Sudhakar Nalawade ACB Trap

Related Posts