IMPIMP

ACB Trap News | अडीच हजार रुपये लाच घेताना ससून रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

by sachinsitapure
ACB Trap News | Senior clerk of Sasoon Hospital caught in anti-corruption net while taking bribe of 2500 rupees

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – वैद्यकीय बीलाची (Medical Bills) फाईल पूर्ण करुन देण्यासाठी अडीच हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) ससून हॉस्पिटल मधील (Sassoon Hospital) अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला (Senior Clerk) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB Trap News) सापळा रचून रंगेहाथ पकडले. गणेश सुरेश गायकवाड Ganesh Suresh Gaikwad (वय-49) असे लाच घेताना पकडलेल्या वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. पुणे एसीबीच्या पथकाने (ACB Trap News) ही कारवाई गुरुवारी (दि.10) ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर केली.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

याबाबत 46 वर्षीय महिलेने पुणे एसीबीकडे (ACB Trap News) तक्रार केली आहे. तक्रारदार महिला या शासकीय सेवक आहेत. त्यांचे 1 लाख 7 हजार रुपयांचे वैद्यकीय देयक फाईल मंजुरीकरता ससून हॉस्पिटल येथील अधीक्षक कार्यालयातील वैद्यकीय आवक जावक विभागात दिली होती. वैद्यकीय देयकामध्ये त्रुटी न काढता फाईल पूर्ण करुन देण्यासाठी गणेश गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपयांची लाच मागितली.

तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसबी (Pune ACB Trap News) कार्यालयात तक्रार केली. त्यानुसार पथकाने बुधवारी (दि.9) पडताळणी केली असता गायकवाड यांनी तक्रारदार यांच्याकडे तीन हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 2500 रुपये स्वीकारण्याचे कबूल केले. त्यानुसार पथकाने गुरुवारी ससून हॉस्पिटलच्या नवीन इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना गणेश गायकवाड याला रंगेहाथ पकडण्यात आले. गायकवाड यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundagarden Police Station) भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण (PI Vidyulata Chavan) करीत आहेत.

ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (Pune ACB) पोलीस अधीक्षक अमोल तांबे (SP Amol Tambe),
अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे (Addl SP Sheetal Janve) यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव (DySP Nitin Jadhav), पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण पोलीस अंमलदार
सरिता वेताळ, रियाज शेख, प्रविण तावरे, पांडुरंग माळी यांच्या पथकाने केली.

Web Title : ACB Trap News | Senior clerk of Sasoon Hospital caught in anti-corruption net while
taking bribe of 2500 rupees

Related Posts