IMPIMP

ACB Trap On Police Havaldar | 25 हजाराची लाच घेताना पोलिस हवालदार अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

by nagesh
ACB Trap On Police Havaldar | Police Havaldar in anti-corruption net while taking bribe of 25 thousand

नांदेड : सरकारसत्ता ऑनलाईन – ACB Trap On Police Havaldar | 25 हजार रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी नांदेड जिल्हयातील भोकर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदाराला अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने अटक केली आहे. त्यामुळे नांदेड पोलिस (Nanded Police) दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (ACB Trap On Police Havaldar)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सुभाष लोभाजी कदम Police Subhas Lobhaji Kadam (56, रा. हदगाव, जि. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव आहे (Nanded Bribe Case). याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराच्या बहिणीचे व शेजार्‍यांचे भांडण झाले होते. त्यानंतर तक्रारदाराच्या बहिणीने आणि समोरील पार्टीने एकमेकांविरूध्द भोकर पोलिस ठाण्यात (Bhokar Police Station) क्रॉस कप्लेंट केली होती. तक्रारदाराच्या बहिणीला मार लागला होता. तरीदेखील त्यांनी फिर्याद न घेता केवळ एनसी नोंदवून घेण्यात आली होती. त्याविरूध्द तक्रारदाराच्या बहिणीने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना भेटून गुन्हा दाखल करण्याची विनंती केली होती. त्यात वरिष्ठ अधिकार्‍यांनी सदर प्रकरणात फेर चौकशीचे आदेश दिले होते. त्यानंतर समोरील पार्टीच्या विरूध्द गुन्हा दाखल झाला मात्र तक्रारीत दिलेल्या सर्व आरोपींविरूध्द गुन्हा दाखल न करता फक्त चार पुरूष आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. (ACB Trap On Police Havaldar)

 

समोरील पार्टीच्या तक्रारीवरून दाखल एनसीचा तपास पोलिस हवालदार सुभाष कदम यांच्याकडे होता.
त्या एनसीमध्ये मदत करतो आणि दाखल गुन्हयात देखील मदत करतो म्हणून पोलिस हवालदार सुभाष कदम
यांनी 25 हजाराच्या लाचेची मागणी केली होती. दि. 21 मार्च रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली.
सरकारी पंचासमक्ष पोलिस हवालदार सुभाष कदम यांनी लाच घेतली असता त्यांना अटक करण्यात आली.
(Nanded ACB Trap Case)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिस अधीक्षक राजकुमार शिंदे (SP Rajkumar Shinde), पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उप अधीक्षक
राजेंद्र पाटील (DySP Rajendra Patil) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक अशोक इप्पर
(DySP Ashok Ipper) , पोलिस नाईक बालाजी मेखाले, पोलिस कर्मचारी रितेश कुलथे, सय्यद खदिर,
चालक पोलिस नाईक नीलकंठ यमुनवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

 

 

Web Title : ACB Trap On Police Havaldar | Police Havaldar in anti-corruption net while taking bribe of 25 thousand

 

हे देखील वाचा :

Salman Khan | जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान खानने दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाला….

Maharashtra Budget 2023 | अर्थसंकल्प राज्याचा…संकल्प पुण्याच्या विकासाचा…!

Bharti Vidyapeeth | ‘डायनॅमिक बिझनेस एनव्हायर्नमेंट अँड इंडियन इकॉनॉमी’ विषयावर राष्ट्रीय परिषदेला प्रतिसाद

 

Related Posts