IMPIMP

Salman Khan | जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान खानने दिली ‘हि’ प्रतिक्रिया; म्हणाला….

by nagesh
Salman Khan | bollywood actor salman khan on receiving death threats

सरकारसत्ता ऑनलाईन टीम : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलीवूडचा भाईजान सलमान (Salman Khan) खान हा चर्चेत आहे. सलमानच्या टीम मधील एका व्यक्तीला ईमेल द्वारे सलमानला (Salman Khan) जीवे मारण्याची धमकी (threat) देण्यात आली होती. या ईमेल नंतर सलमानला Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. तर मुंबईतील वांद्रे भागात असणाऱ्या त्याच्या घराभोवती कडक संरक्षणाचे चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. आता संपूर्ण प्रकरणावर सलमानने त्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सलमान खानला ही धमकी मिळाल्यानंतर त्याचे कुटुंबीय आणि मित्र परिवारामध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे. तर वडील सलीम खान (Salim Khan) ही खूपच चिंतेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांना चिठ्ठीतून सलमानला जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर या प्रकरणामुळे त्यांची शांतता भंग झाल्याचे दिसत आहे. मात्र या संपूर्ण घटनेत कुटुंबाच्या चिंतेला पाहून त्यांच्या काळजीपोटी सलमानने आपले अनेक आउटडोर शूट रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. सलमानच्या निकटवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार सलमान या संपूर्ण प्रकरणाला फारसे महत्त्व देताना दिसत नाही त्याच्यामते “धमकीला महत्त्व देऊन आपण त्या धमकी देणाऱ्याचे महत्त्व वाढवत आहोत. जे जेव्हा व्हायचे आहे तेव्हा होईल.” असे म्हणत सलमान या संपूर्ण तणावाच्या वातावरणात स्वतःचे मन शांत ठेवताना दिसत आहे.

 

काय आहे नेमके प्रकरण?

काही दिवसांपूर्वी ईमेल द्वारे सलमानला (Salman Khan) अशी धमकी मिळाली होती की,
“गोल्डी भाई को बात करनी है तेरे बॉस सलमान से. इंटरव्ह्यू (लॉरेन्स बिश्नोई) देख लिया होगा उसने.
अगर नही देखा तो बोल देना देख लेना. मॅटर क्लोज करना है तो बात करवा दियो.
फेस टू फेस करना है तो बता दियो. अभी टाइम रहते इन्फॉर्म कर दियो, अगली बार बडा झटका देंगे” आणि हा ई-मेल rohitgarg<[email protected]> या ईमेल आयडी वरून पाठवण्यात आला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : Salman Khan | bollywood actor salman khan on receiving death threats

 

हे देखील वाचा :

Maharashtra Budget 2023 | अर्थसंकल्प राज्याचा…संकल्प पुण्याच्या विकासाचा…!

MLA Bachchu Kadu | ‘संजय राऊतांच्या मेंदूत फरक पडलाय, त्यावर…’, ‘त्या’ टीकेवर बच्चू कडूंचा खोचक टोला

Bharti Vidyapeeth | ‘डायनॅमिक बिझनेस एनव्हायर्नमेंट अँड इंडियन इकॉनॉमी’ विषयावर राष्ट्रीय परिषदेला प्रतिसाद

 

Related Posts