IMPIMP

Adinath Cooperative Sugar Factory | शेतकऱ्यांचा रोहित पवारांना धक्का? ‘तो’ कारखाना बारामती ॲग्रोला देण्याचा ठराव रद्द!

by nagesh
Rohit Pawar | rohit pawar reaction on satyajeet tambe nashik graduate constituency election ram shinde and iqubal singh chahal ed notice

सोलापूर : सरकारसत्ता ऑनलाइन Rohit Pawar | उजनी धरणाच्या (Ujani Dam) ऊस पट्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना (Adinath Cooperative Sugar Factory) आता शेतकरी सभासदांनी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. कारखाना बंद राहिल्यामुळे कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झालं आहे. सभासदांनी घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना मोठा धक्का बसला आहे. (Adinath Cooperative Sugar Factory)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

19 जुलै 2019 ला वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक प्रमाणे बारामती ॲग्रोला (Baramati Agro) आदिनाथ सहकारी साखर कारखाना (Adinath Cooperative Sugar Factory) भाड्याने देण्याचा ठराव झाला होता. मात्र करार (Agreement) केल्यानंतर दोन वर्षांनीसुद्धा कारखाना बंद राहिला. यामुळे कारखान्यावर 20 ते 25 कोटी रूपयांच्या कर्जाचा बोजा वाढला आणि दोन वर्षांचं वार्षिक भाडंही मिळालं नाही. त्यामुळे एकंदरित 35 ते 40 कोटींचं रूपयाचं नुकसान (Loss) झालं आहे.

 

मुबलक ऊस असताना कारखाना बंद असल्या कारणामुळे शेतकऱ्यांना ऊस जाळावा लागला.
याला रोहित पवार जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
बारामती ॲग्रोला देण्याचा ठराव रद्द करावा, ही मागणी 282 मताने मंजूर झाली आहे.
बारामती ॲग्रोच्या मागणीच्या बाजूने फक्त 34 मते पडली.
यामुळे आता बारामती ॲग्रोला आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाड्याने देण्याचा ठराव रद्द झाला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दरम्यान, साखर कारखाना हा सहकारी तत्वावर चालला पाहिजे ही काळाजी गरज असल्याचं कारखान्याच्या सभासदांनी म्हटलं आहे.
त्यामुळे आता सभासदांनी (Members) मोठी रक्कम उभी करत कारखाना चालवण्यासाठी प्रयत्न केला आहे.

 

Web Title :- Adinath Cooperative Sugar Factory | setback to rohit pawar on adinath sahakari sakhar karkhana issue farmers take big decision

 

हे देखील वाचा :

Gully Boy Fame Rapper Dharmesh Dies | ‘गली बॉय’ मधील रॅपरला 4 महिन्यात आले दोन हार्ट अटॅक, धर्मेशची आई म्हणाली – ‘त्याला वाचविण्यासाठी मी काहीही करू शकले नाही…’

Sanjay Raut | संजय राऊत यांची जोरदार टीका; म्हणाले – ”किरीट सोमय्या म्हणजे सिरिअल…”

Arvind Kejriwal | केजरीवालांचं थेट भाजपला आव्हान ! म्हणाले – ‘त्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर राजकारण सोडणार’;

 

Related Posts