IMPIMP

Arvind Kejriwal | केजरीवालांचं थेट भाजपला आव्हान ! म्हणाले – ‘त्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर राजकारण सोडणार’;

by nagesh
Arvind Kejriwal | we will leave politics aap leader arvind kejriwal challenges bjp over delhi mcd elections

सरकारसत्ता ऑनलाइन – Arvind Kejriwal | देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये महापालिका एकत्र करण्याबाबतच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळात मंजुरी देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी थेट भाजपला आव्हान दिलं आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दिल्लीतील महापालिका निवडणुका (Municipal Elections Delhi) टाळणे हा शहिदांचा अपमान आहे. पराभवाच्या भीतीने भाजप (BJP) निवडणुका घेणं टाळत आहे. भविष्यात हे विधानसभा आणि लोकसभाही घेणार नाहीत. जर आताच दिल्लीतील महापालिका निवडणुकीत भाजपने विजय मिळवला तर मी राजकारण (Politics) सोडेन, असं अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी म्हटलं आहे.

 

भाजप स्वत:ला जगातील सर्वात मोठा पक्ष मानतो मात्र हाच जगातील पक्ष एका छोट्या आम आदमी (AAP) पक्षाला घाबरून पळ काढत आहे?, जर हिंमत असेल तर महापालिका निवडणुका वेळेत घेऊन दाखवाव्यात, असंही केजरीवाल म्हणाले.

 

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या टीकेवर भाजपकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये केजरीवालांच्या झाडूने पंजाब (Punjab) राज्यात काँग्रेस (Congress) आणि भाजपचा सफाया केला आहे.
या निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप आणि आप समोरासमोर आले आहेत.

 

Web Title :- Arvind Kejriwal | we will leave politics aap leader arvind kejriwal challenges bjp over delhi mcd elections

 

हे देखील वाचा :

Randeep Hooda | रणदीप हु़ड्डा बनणार ‘स्वातंत्रसैनिक वीर सावरकर’ ! फर्स्ट लूक शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ..

Kirit Somaiya | ‘त्यांनी खुर्चीसाठी आयुष्य आणि धर्मही विकला, ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा कसला देतायत’ – किरीट सोमय्या

Rupali Chakankar | रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा (व्हिडीओ)

 

Related Posts