IMPIMP

Sanjay Raut | संजय राऊत यांची जोरदार टीका; म्हणाले – ”किरीट सोमय्या म्हणजे सिरिअल…”

by nagesh
Kirit Somaiya | now sanjay rauts stay will be nawab maliks neighbor in arthur road jail

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाइन Sanjay Raut | महाविकास आघाडी सरकारमधील (Maha Vikas Aghadi Government) काही नेत्यांच्या मागे ई़डीचा (ED) ससेमिरा लागला आहे. अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर ईडीने (ED) कारवाई केल्यानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली. यानंतर सत्ताधारी आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात आरोपांच्या फैरी सुरू आहेत. या कारवाईवरुन भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ठाकरे परिवारांवर खळबळजनक आरोप केले. यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

किरीट सोमय्या म्हणाले, ”हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी (Nandakishor Chaturvedi) आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध काय? असा सवाल किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) विचारला आहे. 2014 मध्ये आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी तयार केलेली कंपनी नंदकिशोर चतुर्वेदीची कशी झाली? असा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांची झोप उडाली असेल,” असा शाब्दिक टोला देखील लगावला.

 

सोमय्यांच्या आरोपानंतर संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, ”किरीट सोमय्यांनी जे आरोप केले ते काही देशाचे मुख्य न्यायमूर्ती झाले आहे का? असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी ज्या पद्धतीने सिरीयल किलर असतात, रेपिस्ट असतात त्या पद्धतीनेच हे सीरियल कम्प्लेंट झालेले आहेत, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु असल्याचा देखील आरोप राऊत यांनी केला.”

 

पुढे संजय राऊत म्हणाले, ”ईडीचे अधिकारी फक्त आमच्याच मागे लागले आहे, काय तर म्हणे आमच्याकडे पैसे आहेत.
भाजपच्या नेत्यांकडे काहीच पैसे नाहीत तर ते काय भीक मागत आहे का,
केंद्रीय तपास यंत्रणांना हे जर दिसत नसेल तर त्यांचा चष्म्याच नंबर हा बदलावा लागेल अशी टीकाही त्यांनी केलीय.”
तसेच, ”काही लोकांना दिलासा दिला जातो मात्र आमच्या तक्रारीवर काहीच होत नाही.
महाराष्ट्र सरकार ज्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा प्रयत्न करतं त्यांना कोर्टाकडून दिलासा मिळतो.
परमबीर सिंग यांच्यासारख्या 25 लोकांना दिलासा मिळाला.
मात्र , महाविकास आघाडीच्या कुठलाही नेत्यांना दिलासा मिळत नाही? ”असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

 

Web Title :- Sanjay Raut | serious allegations of sanjay raut against kirit somaiya after ed action

 

हे देखील वाचा :

Arvind Kejriwal | केजरीवालांचं थेट भाजपला आव्हान ! म्हणाले – ‘त्या निवडणुकीत भाजपचा विजय झाला तर राजकारण सोडणार’;

Randeep Hooda | रणदीप हु़ड्डा बनणार ‘स्वातंत्रसैनिक वीर सावरकर’ ! फर्स्ट लूक शेअर करून सोशल मीडियावर धुमाकूळ..

Kirit Somaiya | ‘त्यांनी खुर्चीसाठी आयुष्य आणि धर्मही विकला, ते मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा कसला देतायत’ – किरीट सोमय्या

 

Related Posts