IMPIMP

Ahmednagar Firing Case | साई पालखीत गोळीबार, एकजण गंभीर जखमी; संशयित ताब्यात

by nagesh
Nanded Firing Case | nanded firing case woman congress worker firing in nanded three people

अहमदनगर : सरकारसत्ता ऑनलाईन – Ahmednagar Firing Case | साई पालखीत (Shirdi Sai Baba Palkhi) गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना शिर्डी येथील सावळीविहीर जवळ घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीच्या खांद्याला गोळी लागली असून त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विकी भांगे Vicky Bhange (वय-30 रा. पुसद, यवतमाळ) असे गोळीबार (Ahmednagar Firing Case) करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. तर निलेश सुधाकर पवार Nilesh Sudhakar Pawar (वय-27 रा. पुसद हल्ली रा. गोरेगाव, मुंबई) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथून साईंची पालखी शिर्डीकडे जात होती. याच पालखीत संशयित विकी भांगे आणि सुधाकर पवार सहभागी झाले होते. पालखी शिर्डीत पोहोचल्यानंतर आरोपी भांगे याने वैयक्तीक कारणावरुन निलेश पवार याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात (Ahmednagar Firing Case) निलेश पवार हे जखमी झाले असून त्यांच्यावर साईबाबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गोळीबार करणाऱ्या भांगेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बहिणी सोबत लग्न केल्याच्या रागातून गोळीबार
गोळीबारीच्या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली वैयक्तिक कारणातून
हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे.
जखमी निलेश याने भांगे याच्या बहिणीसोबत दोन वर्षापूर्वी पळून जाऊन लग्न केले होते.
याचाच राग असल्याने गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे.
या घटनेमुळे शिर्डीत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Ahmednagar Firing Case | firing has taken place in shirdi sai baba palkhi

 

हे देखील वाचा :

Gopichand Padalkar | ‘आता आरक्षण बस झालं’ शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन पडळकरांचा हल्लाबोल म्हणाले-‘हे आरक्षणाच्या विरोधात, त्यांचा खरा चेहरा…’

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांनी शिक्षणमंत्री केसरकर घायाळ; असं काय घडलं नेमकं?

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री खोटे बोलले, वीज तोडल्या प्रकरणी शेतकऱ्याची थेट फडणवीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार

 

Related Posts