IMPIMP

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री खोटे बोलले, वीज तोडल्या प्रकरणी शेतकऱ्याची थेट फडणवीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार

by nagesh
Devendra Fadnavis | hingoli farmer dashrath mule police complaint against dy cm devendra fadnavis

हिंगोली : सरकारसत्ता ऑनलाईन- रब्बी हंगामात पिकाला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी फरफट झाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. थकीत वीज बिलासाठी (Overdue Electricity Bill) वीज तोडू नये, अशा सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिल्या आहेत. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी सूचना देऊन देखील माझी वीज तोडली. ते खोट बोलत असल्याचा आरोप करीत या प्रकरणाची चौकशी (Inquiry) करुन दवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर किंवा महावितरणच्या (MSEDCL) दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे (FIR) दाखल करावेत. अशी तक्रार हिंगलो जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्यात (Goregaon Police Station) एका शेतकऱ्याने दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दशरथ गजानन मुळे Dashrath Gajanan Mule (रा. माझोड ता. सेनगाव) असे तक्रार देणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. 21 नोव्हेंबर रोजी मध्यमांना दिलेल्या मुलाखीत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले होते की, ज्या भागात अतिवृष्टी (Heavy Rains) झाली आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाले, अशा भागात वीज पुरवठा (Power Supply) खंडित करु नये व सक्तीची वीज बिल वसुली देखील करु नये, अशा सूचना त्यांनी महावितरण कंपनीला दिले होते. तरी देखील वीज वितरण कंपनीने शेताचा वीज पुरवठा खंडित केला. माझीच नाही तर इतर अनेक जणांची वीज कापली, असे मुळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.

 

मला अतिवृष्टीच्या मदतीची रक्कम बिलापोटी भरावी लागली.
यासाठी महावितरणने दादागिरीची भूमिका घेतली होती. यामुळे उपमुख्यमंत्री खोटे बोलल्याचे निदर्शनास आले.
त्याची चौकशी करुन त्यांच्यावर अथवा महावितरणच्या दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा,
असे गोरेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

 

 

Web Title :– Devendra Fadnavis | hingoli farmer dashrath mule police complaint against dy cm devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | मंत्रालयातील बोगस नोकर भरती प्रकरणी चौकशीनंतर कारवाई- उपमुख्यमंत्री फडणवीस (व्हिडिओ)

Constipation | या फूड्सने पोटात वाढतील गुड बॅक्टेरिया, ताबडतोब गायब होईल बद्धकोष्ठतेची समस्या

Pune Crime News | ब्रेड परत करण्यासाठी गेलेल्या मुलास बेदम मारहाण, समर्थ पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा

 

 

Related Posts