IMPIMP

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या प्रश्नांनी शिक्षणमंत्री केसरकर घायाळ; असं काय घडलं नेमकं?

by nagesh
Uddhav Thackeray | uddhav thackeray blunt questions directly to deepak kesarkar in nagpur winter session

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – नागपूर येथील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) आज शेवटचा दिवस असल्याने एकनाथ
शिंदे (Eknath Shinde) – देवेंद्र फडणवीस सरकार (Devendra Fadnavis Government) आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत
आहेत. त्यातच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील या अधिवेशनास हजेरी लावत सहभाग नोंदविला आहे. त्यामुळे ‘मविआ’च्या ताफ्यात
वारू संचारल्यासारखे सगळे आक्रमक झाले. एकनाथ शिंदे गटामधील मंत्र्यांवर आरोप करत अब्दुल सत्तार (Abdul Sattar), संजय राठोड (Sanjay
Rathod) व शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), उदय सामंत (Uday Samant) यांनी राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी विरोधकांकडून
करण्यात आली. याबरोबरच मुख्यमंत्री शिंदे यांनादेखील भूखंड प्रकरणावरून टार्गेट करत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशीही मागणी केली.
(Uddhav Thackeray)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे गटावर वारंवार फैरी झाडल्या आहेत. यातच २९ डिसेंबर रोजी एकनाथ शिंदे गटाचे तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) आणि उद्धव ठाकरे काही काळासाठी एकदम समोरासमोर आले. उद्धव ठाकरे यांनी थेट प्रश्नांचा भडिमार केल्याने शिक्षणमंत्री केसरकर चाचपडल्याचे दिसले.

 

शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे नीलम गोऱ्हेंच्या (Neelam Gorhe) दालनामधून निघत असताना त्याचवेळी उद्धव ठाकरे दालनात जात असताना दोघेही समोरासमोर आले. काही क्षणांतच उद्धव ठाकरे यांनी ठाकरी भाषेत खडसावण्यास सुरुवात केली. ठाकरे त्यांना म्हणाले, आम्ही तुमचे काय वाईट केले, आमच्याशी वागताना एवढे निर्ढावल्यासारखे व कठोर कसे झालात, असा प्रश्नांचा भडिमार केल्यानंतर केसरकरांना काहीच कळले नाही. थोडा वेळ गांगरले व बोलतीच बंद झाली. तुम्हाला काय कमी केलं? तुम्हीच आमच्या विरोधात चौकशी करत आहात, आमची कार्यालये ताब्यात घेत आहात. तुम्ही एवढे मोठे कोणाच्या जिवावर झालात, मग कठोर होऊन का वागता, असे ठाकरे म्हणत असतानाच शिक्षणमंत्री केसरकर यांना काहीच बोलता आले नाही; यावर फक्त आमच्यावर नाराज आहात का? असा प्रतिप्रश्न करून तातडीने निघून गेले, मग उद्धव ठाकरे गोऱ्हे यांच्या दालनात गेले. मात्र, एकनाथ शिंदे गटाकडून ठाकरे गटावर अनेक आरोप करणाऱ्या केसरकरांना ठाकरे थेट समोर दिसताच गांगरून त्यांची बोलती बंद झाली.

 

सरकारवर विरोधकांनी हल्ला चढवला

हिवाळी अधिवेशनात बोलताना उद्धव ठाकरेंनी गुरुवारी एकनाथ शिंदे गट आणि भाजपावर (BJP) चांगलाच हल्लाबोल
केला. दोन दिवसांत सत्तेतील चार मंत्र्यांवर जोरदार आरोप करण्यात आले.
या अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले.
यामध्ये राजीनामा देण्यात यावा, याकरिता जोरदार मागण्या करण्यात आल्या.
एवढ्यावरच न थांबता विरोधकांनी सभागृहासमोरही आंदोलनं केली.
तरीपण एकाही मंत्र्याचा राजीनामा घेण्यात आलेला नाही.
एकंदरीत या प्रकरणांविषयी गंभीरता लक्षात घेऊन सरकारने त्यांचे राजीनामे घेतले पाहिजेत.
असे अनेक आरोप झाल्यावरही क्लीन चिट देणार का? असा प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :– Uddhav Thackeray | uddhav thackeray blunt questions directly to deepak kesarkar in nagpur winter session

 

हे देखील वाचा :

Weight Loss Tips | या ४ प्रकारे करा ओव्याचे सेवन, मिळेल इलियाना डिक्रूजसारखी Zero Figure

Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री खोटे बोलले, वीज तोडल्या प्रकरणी शेतकऱ्याची थेट फडणवीसांविरुद्ध पोलिसांत तक्रार

Constipation | या फूड्सने पोटात वाढतील गुड बॅक्टेरिया, ताबडतोब गायब होईल बद्धकोष्ठतेची समस्या

 

Related Posts