IMPIMP

Ajit Pawar | अजित पवार भाजपाबरोबर जाणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar comment on anjali damania claim about going with bjp

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) लवकरच भाजपाबरोबर (BJP) जाणार असल्याचा दावा केला आहे. अंजली दमानिया यांनी केलेल्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics News) चर्चांना उधाण आले आहे. दमानिया यांनी केलेल्या दाव्यावर अजित पवार  यांना विचारले असता, त्यांनी एका वाक्यात पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहेत आणि तेही लवकरच असंट ट्विट अंजली दमानिया यांनी केलं होतं. या दाव्यावर अजित पवार यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं असता ते म्हणाले, एवढ्या मोठ्या व्यक्तीबद्दल माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय सांगणार आहे, असे म्हणत अजित पवार यांनी दमानिया यांच्या ट्विटची खिल्ली उडवली आहे.

 

 

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आज मंत्रालयात (Mumbai Mantralaya) कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहे… तेही लवकरच. त्या पुढे लिहितात, महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar comment on anjali damania claim about going with bjp

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे : बिल्डरकडे 30 लाखाच्या खंडणीची मागणी, कोंढवा पोलिस ठाण्यात तिघांविरूध्द गुन्हा

Maharashtra Politics News | ‘अजित पवार भाजप बरोबर जाणार…तेही लवकरच’, अंजली दमानियांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ; चर्चांना उधाण

Ajit Pawar | अजित पवारांना ईडीकडून दिलासा! ‘त्या’ प्रकरणात अजित पवारांसह सुनेत्रा पवारांचे नाव आरोपपत्रातून वगळले

Ajit Pawar | अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका, पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याची पोलिसांत तक्रार

 

Related Posts