IMPIMP

Ajit Pawar | अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका, पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याची पोलिसांत तक्रार

by nagesh
Ajit Pawar | bjp officials in pune filed a police complaint against ajit pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडून आपल्या जीवाला धोका आहे, असं म्हणत पुण्यातील भाजप (Pune BJP)
पदाधिकाऱ्याने पुणे पोलिसांकडे (Pune Police) तक्रार दाखल केली आहे. रवींद्र साळगावकर (Ravindra Salgaonkar) असे तक्रार (Pune Crime
News) दाखल करणाऱ्या भाजप पदधिकाऱ्याचे नाव आहे. साळगावकर यांनी खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) तक्रार दिली असून
या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर अजित पवार (Ajit Pawar) काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रवींद्र साळगावकर हे पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातील (Shivajinagar Constituency) भाजपचे अध्यक्ष आहेत. साळगावकर यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. यामध्ये त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यापासून माझ्या जीवाला धोका (Danger to Life) असल्याचे म्हटले आहे. गणेशखिंड रस्त्यावर (Ganeshkhind Road) ई-स्क्वेअरच्या समोर एक प्लॉट आहे. त्यासंदर्भात त्यांनी तक्रार दिली आहे.

 

गणेशखिंड परिसरातील एका प्लॉटचा ताबा साळगावकर यांच्याकडे असून त्यांना सतत धमक्या (Threats) येत आहेत. या मोकळ्या प्लॉटची मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही मोजणी केली जात आहे. याबाबत पुणे शहर तहसील कार्यालयातही (Pune City Tehsil Office) या  प्लॉटच्या बाबतीत अजित पवार यांच्या नावाची चिठ्ठी लावली होती. तरीही तहसील कार्यालयातून साळगावकर यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहे. याच प्रकरणाबाबत साळगावकर यांनी अजित पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी साळगावकर यांचा तक्रार अर्ज स्विकारला असून तपास सुरु करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रवींद्र साळगावकर हे मागील अनेक वर्षापासून भाजपचे पदाधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या लेटर हेडवर अजित पवार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. अजित पवार यांच्यापासून माझ्या जिवाला धोका असल्याचे त्यांनी स्पष्ट लिहिले आहे. त्यामुळे पोलिसांनी अजित पवारांची चौकशी करावी. त्याचा तपास करावा अशी मागणी केली आहे.

 

 

Web Title :-  Ajit Pawar | bjp officials in pune filed a police complaint against ajit pawar

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | बारामती : दगडाने ठेचून युवकाचा खून, प्रचंड खळबळ

Pune Crime News | उसने दिलेले पैसे परत मागितल्याने धमकी दिल्याने महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

Maharashtra Politics News | महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं वळण, अखेर मुंडे बहिण भावाच्या संघर्षाला पूर्णविराम!

 

Related Posts