IMPIMP

Maharashtra Politics News | ‘अजित पवार भाजप बरोबर जाणार…तेही लवकरच’, अंजली दमानियांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ; चर्चांना उधाण

by nagesh
Maharashtra Politics News | anjali damania tweet claiming ajit pawar will join bjp soon

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Politics News | महाराष्ट्रात आणखी एक राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे
(NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) लवकरच भाजपमध्ये (BJP) जातील असा दावा सामाजिक कार्यकर्त्या आणि पूर्वीच्या आम आदमी पक्षाच्या
(Aam Aadmi Party) नेत्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला आहे. अंजली दमानिया यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं असून यामध्ये
(Maharashtra Politics News) त्यांनी एकप्रकारे ही भाजपची पुढील राजकीय रणनिती असल्याचे सांगितले आहे. अंजली दमानिया यांच्या ट्विटमुळे
राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून त्याचे ट्विट सध्या चर्चेत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंजली दमानिया यांनी ट्विटमध्ये म्हटले की, आज मंत्रालयात (Mumbai Mantralaya) कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपाबरोबर जाणार आहे… तेही लवकरच. त्या पुढे लिहितात, महाराष्ट्राच्या राजकारणाची आणखी किती दुर्दशा होतेय ते बघू.

 

पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या नाराजीच्या (Maharashtra Politics News) चर्चा वारंवार होतात. अशातच या ट्विटने या चर्चांना आणखी वेग आला आहे. त्यामुळे अजित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

 

बँक घोटाळाप्रकरणी अजित पवारांना ईडीची क्लीनचिट?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणात (Maharashtra State Cooperative Bank Scam Case) मुंबई सत्र न्यायालयातील (Sessions Court, Mumbai) विशेष PMLA कोर्टात (Special PMLA Court) ईडीने आरोपपत्र (Charge Sheet) दाखल केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या आरोपपत्रात अजित पवार आणि सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे नाव नाही. या प्रकरणात अजित पवार यांच्यावर अनेक आरोप झाले होते. परंतु ईडीच्या आरोपपत्रात या दोघांवर आरोपी असल्याचा ठपका नाही. मात्र अद्याप न्यायालयाकडून आरोपींची दखल घेण्यात आलेली नाही.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Maharashtra Politics News | anjali damania tweet claiming ajit pawar will join bjp soon

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | अजित पवारांना ईडीकडून दिलासा! ‘त्या’ प्रकरणात अजित पवारांसह सुनेत्रा पवारांचे नाव आरोपपत्रातून वगळले

Ajit Pawar | अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका, पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याची पोलिसांत तक्रार

Pune Crime News | उसने दिलेले पैसे परत मागितल्याने धमकी दिल्याने महिलेने गळफास घेऊन केली आत्महत्या

 

Related Posts