IMPIMP

Ajit Pawar | अजित पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारला खोचक टोला; ‘एकदा मंत्रीमंडळ विस्तार कराचं, उरलेले पण आमदार निघूण…’

by nagesh
Ajit Pawar | send ajit pawar in pakistan says bjp former mla narendra pawar over statement sambhaji maharaj is not dharmveer

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन   राज्याचे हिवाळी अधिवेशन हे चांगलेच तापले आहे. विविध मुद्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर निशाना साधत आहेत. त्यातच आज (दि. २९ डिसेंबर) रोजी विरोधीपक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) सत्ताधाऱ्यांना मंत्रीमंडळ विस्तारावरून टोला लगावला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी मंत्रीमंडळ विस्तारावरून सरकारची कानउघडणी केली होती. तसेच मंत्रीमंडळात एकही महिला समाविष्ट नसल्याची टीकाही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली होती. त्यातच त्यांनी आज (दि. २९ डिसेंबर) देखील मंत्रीमंडळ विस्ताराच्या मुद्याला हात घालत सत्ताधाऱ्यांची कानउघडणी केली. (Ajit Pawar)

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अडचणींच्या विषयावर बोलले नाही. कुठं कसं काय बोलाव आणि कुठंल बोलू नये, कशाला नेमके दुर्लक्षित करावं हे फडणवीसांना चांगलेच जमते. मी मंत्रीमंडळात एकही महिला मंत्री नाही हा विषय काढला होता. त्या विषयाला त्यांनी स्पर्शच केला नाही. त्यावेळी त्यांनी सुनेत्राताईंचं देखील नाव घेतलं. पण ते वेगळ्या अर्थाने. मात्र मला तसलं काही सांगू नका.’ अशा मिश्किल शब्दात त्यांनी फडणवीसांना टोला लगावला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, ‘तिथं आमच्या मंदाताई, मनिषाताई अशा महिला लक्ष ठेवून आहेत. मी गंमतीने म्हणतो असे नाही. पण ज्यावेळी आपण राज्याला घेऊन पुढे जात असतो आणि तेव्हा महिलांनाही प्रतिनिधित्व द्या आणि बाकीच्याही जागा भरा. कोणाला घ्यायचे त्याला घ्या. असे परखड मत अजित पवारांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.’

 

मंत्रीमंडळ विस्तारावर पुढे बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले,
‘मी तुम्हाला सांगतो, तुम्ही अजिबात घाबरू नका. त्या जागा एकदा का ४३ केल्या की,
उरलेले आमदार निघूण जातील याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण दोघे धरून वीसचं मंत्री आहेत.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आणखी २३ मंत्री करण्याचा अधिकार आहे.’ असेही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar comment on eknath shinde devendra fadnavis cabinet expansion

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | संजय राऊतांना भाजपच्या ‘या’ आमदाराचे थेट आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल, तर…’

CM Eknath Shinde | धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा

MP Sanjay Raut | संजय राऊतांना भाजपच्या ‘या’ आमदाराचे थेट आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल, तर…’

 

 

Related Posts