IMPIMP

CM Eknath Shinde | धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा

by nagesh
CM Eknath Shinde | cm eknath shinde clarrification on bjp chandrakant patil controversial statement on babri masjid demolition

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे हिवाळी अधिवेशन हे नागपूर येथे सुरू आहे. त्याचदरम्यान राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एक महत्वाची घोषणा केली आहे. याचा लाभ राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना त्यांनी अनुदान जाहीर केले असून हे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. (CM Eknath Shinde)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५ हजारांचा बोनस जाहीर केला आहे. त्याबाबतची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत बोलताना केली. तसेच या योजनेचा फायदा सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार असून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली.

यावेळी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी विदर्भाबाबतही काही घोषणा केल्या आहेत. ते म्हणाले, विदर्भ मजबूत तर राज्य मजबूत आहे. तसं महाराष्ट्राच्या विकासासाठी विदर्भ महत्वाचा आहे. समृध्दी महामार्गाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, समृध्दी महामार्गामुळे मुंबई नागपूरच्या जवळ आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी नागपूर आणि मुंबई जवळ आणण्याचे काम केले आहे. समृध्दी महामार्गाच्या वेळी आमच्याही आमदारांना विरोध करायला लावला. जमिनी देऊ नका म्हणून सांगण्यात आलं. पण समृध्दीमुळे राज्यात समृध्दी आल्याचे देखील मुख्यमंत्री म्हणाले.

 

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, समृध्दी महामार्गामुळे केवळ वाहनांची ये-जा सुरू
झालेली नसून त्याचाच उपयोग करून आम्ही विदर्भ-मराठवाडा टुरिझम सर्किट तयार करणार आहोत.
इतरवेळी, संभाजीनगरहून नागपूर-अमरावती किंवा अगदी गडचिरोलीपर्यंत पोहचण्यासाठी भरपूर वेळ लागायचा.
पण समृध्दी महामार्गामुळे हा वेळ बराच वाचलाय. विदर्भाचं एक वेगळेपण आहे.
खनिज, ऊर्जा, पाणी, जमीन, शेती, वन ही विदर्भाची बलस्थाने आहेत. येणाऱ्या काळात उद्योग आणि पर्यटन
या क्षेत्रात आपल्याला विदर्भात क्रांती पहायला मिळेल. याचीच सुरूवात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे
समृध्दी महामार्गाच्या माध्यमातून झाली आहे. असेही यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde at nagpur winter assembly session announcement for vidarbha 15 thousand bonus per hectare to paddy farmers

 

हे देखील वाचा :

ICC कडून क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन जाहीर; भारताच्या ‘या’ खेळाडूला मिळाले नामांकन

Ajit Pawar | गायरान जमिनी वाटपाप्रकरणी चौकशी होईपर्यंत सत्तारांचा राजीनामा घ्या – अजित पवार

Teachers and Graduate Constituencies Election | विधानपरिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर, 5 जागांसाठी प्रमुख पक्षांची प्रतिष्ठा पणाला

 

Related Posts