IMPIMP

MP Sanjay Raut | संजय राऊतांना भाजपच्या ‘या’ आमदाराचे थेट आव्हान, म्हणाले – ‘हिंमत असेल, तर…’

by nagesh
Maharashtra Politics News | bjp is burdened by eknath shinde government said mp sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – मुंबई महापालिकेमधील शिवसेना पक्षाच्या (Shivsena Party) कार्यालयाचा ताबा घेण्यावरून बुधवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे गटामध्ये (Eknath Shinde Group) मोठ्या प्रमाणावर संघर्ष झाला. या प्रकरणानंतर महापालिकेने सर्वच पक्षांच्या कार्यालयांना कुलपे लावली आहेत. यावर संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी शिंदे -फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) कडाडून टीका केली. हे जे सर्व चालू आहे ते कोणाच्या आदेशानुसार आहे. यास कायद्याचे राज्य म्हणता येणार नाही. महापालिकेतील कार्यालय हे शिवसेनेचंच आहे आणि राहील, असे राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले. संजय राऊत यांच्या या टीकेचा भाजपाचे आमदार प्रसाद लाड (BJP MLA Prasad Lad) यांनी समाचार घेतला आहे. तुमच्यात हिंमत असेल तर पालिकेतील कार्यालय पुन्हा ताब्यात घेऊन दाखवा, असे आव्हानच लाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

“मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याप्रती आदर आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी शिवसेना भवन (Shiv Sena Bhavan) हे मंदिर आहे. त्याबाबत ही जी वास्तू आहे त्याबद्दल त्यांच्या मनात काही येईल, हे आधी राऊतांनी डोक्यातून काढावे. महापालिकेतील शिवसेना पक्षाच्या कार्यालयावर ताबा मिळवून कोण किती ताकदवान आहे, याचे उत्तर काल दिले आहे. मी संजय राऊतांना (MP Sanjay Raut) विचारतो, की हिंमत असेल तर मुंबई महापालिकेतील (Brihanmumbai Municipal Corporation (BMC) शिवसेनेचे कार्यालय पुन्हा मिळवून दाखवा,” असे थेट आव्हान लाड यांनी राऊतांना दिले.

 

“शिवसेना पक्षाच्या कार्यालयावरील अधिकाराचा प्रश्नच नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर असल्याने ते आदरस्थानी असून, त्यांचे ते मंदिर आहे. सत्तेतील सरकारचा प्रशासनावर दबाव हा लागतोच. गत सरकारात मात्र तसे नव्हते. मागील सरकार हे प्रशासनाकडूनच पैसे वसूल करत होते, त्यामुळे प्रशासनावर त्यांचा वचक नव्हता. सरकार कसे चालवायचे असते, याबाबतचे ट्रेनिंग राऊत यांनी घेतले पाहिजे,” असा खरमरीत सल्लाही लाड यांनी दिला.

 

संघ मुख्यालयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भेट दिली.
त्याबाबत राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.
संजय राऊत यांच्या टीकेलाही लाड यांनी जशास तसे उत्तर दिले.
“संघ व रेशीमबागेबाबत राऊत का बोलताहेत, हे तुम्हा सर्वांना समजले असेलच की त्यांनी हिंदुत्वाला सोडले आहे.
आता ते काँग्रेसच्या सोनिया गांधी (Congress Sonia Gandhi)
आणि राष्ट्रवादीचे शरद पवार (NCP Sharad Pawar) यांचे जास्त ऐकत आहेत.
हिंदुत्वाबाबत बोलणारे आता हिंदुत्वाचा मुद्द्याला बगल देऊन बोलताहेत.
यामुळेच संजय राऊत रेशीमबागेबाबत बोलत आहेत,” अशी टीकाही भाजपचे लाड यांनी यावेळी केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MP Sanjay Raut | bjp leader prasad lad criticizes sanjay raut on bmc shivsena office clash

 

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा

ICC कडून क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन जाहीर; भारताच्या ‘या’ खेळाडूला मिळाले नामांकन

Ajit Pawar | गायरान जमिनी वाटपाप्रकरणी चौकशी होईपर्यंत सत्तारांचा राजीनामा घ्या – अजित पवार

 

Related Posts