IMPIMP

Ajit Pawar | ‘ओल्या दुष्काळाचे पार वाटोळे…’, शिंदे-फडणवीसांच्या राज्याच्या दौऱ्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar reaction on shinde fadnavis governments on award announced of marathi translation of kobad gandhi original english book was cancelled

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) लवकरच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दोन्ही नेत्यांचा महाराष्ट्र दौरा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. विरोधकांनी या दौऱ्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. बारामतीमध्ये पवारांच्या घरी आज दिवाळीनिमित्त भेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं. यावेळी अजित पवारांच्या (Ajit Pawar) समवेत खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) आणि आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) देखील उपस्थित होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मागील दोन वर्षात कोरोनामुळे सर्व सणांवर बंधने आली होती. यंदा परिस्थिती आटोक्यात असल्याने सर्वांना आनंदाने सण साजरा करता येत आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) अनेक वर्षांची परंपरा आहे. त्यांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. ती परंपरा आज आबाधीत राहिली आहे. आम्ही पवार कुटुंब नेहमीच लोकांमध्ये मिसळत आलो आहोत. यावेळी देखील आम्ही मोठ्या संख्येने आलेल्या जनतेला भेटलो. पावसाने यावेळी व्यत्यय आणला नाही. त्यामुळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. पोलिसांनी देखील योग्य आणि चांगल्या प्रकारचे नियोजन करत कार्यक्रम यशस्वी केला. कार्यकर्त्यांनी देखील समंजसपने हा कार्यक्रम पार पाडला. सर्वांना यावेळी फोटो काढण्याचा मोह असतो. पण कार्यकर्त्यांची मोठी संख्या लक्षात घेता आणि आजच्या दिवसाचे महत्व लक्षात घेता आम्ही फोटो काढण्यावर थोड्या मर्यादा आणल्या होत्या. त्यामुळे कृपा करुन कोणीही नाराज होऊ नये, अशी विनंती मी करतो, असे यावेळी अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

यावेळी अजित पवारांनी राजकीय भाष्य करणे टाळले. तरी देखील पत्रकारांनी त्यांना ओला दुष्काळ
(Wet Drought) यासंबंधी प्रश्न केला असता, पवार म्हणाले, ओला दुष्काळाचे पार आता वाटोळे झाले आहे.
ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत मी स्वत: मुख्यमंत्र्यांना आणि उपममुख्यमंत्र्यांना भेटून परिस्थिती हाताबाहेर
गेलेली आहे, असे सांगितले. शेतकऱ्यांची खरीप आणि रब्बी पिके गेली. तरी देखील कोणीही दाखल घेतली नाही.
आज आनंदाचा सण आहे. दिवाळी आणि पाडव्याचा सण आहे.
त्यामुळे तुम्ही पत्रकारांनी मला राजकीय प्रश्न विचारु नका.
मला काहीतरी बोलून आजच्या सणावर विरझन घालण्याचे काम करायचे नाही, असे अजित पवार म्हणाले.
दिवाळी संपू द्या मग आम्ही त्यावर नक्की भाष्य करु, असेही ते म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Ajit Pawar | ajit pawar ncp slams cm eknath shinde devendra fadnavis on wet draught in maharashtra

 

हे देखील वाचा :

Former MLA Vinayak Nimhan Passed Away | माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन

Jayant Patil | संभाव्य महायुतीवरून राष्ट्रवादीचे भाजपावर टीकास्त्र, जयंत पाटील म्हणाले – टआपण एकमेकांना पुरणार…

Devendra Fadnavis | आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला उत्तर देणे फडणवीसांनी टाळले, एकाच वाक्यात म्हणाले – ‘ते उत्तर देण्यालायक…’

Stitch Scars Removing Tips | एलोवेरा आणि लिंबूच्या रसाने घालवा त्वचेवरील टाक्यांचे व्रण

 

Related Posts