IMPIMP

Ajit Pawar | ‘…बाळासाहेबांना हीच खरी आदरांजली ठरेल’ – अजित पवार

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar paid tribute to balasaheb thackeray on his death anniversary

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा आज (दि. 17 नोव्हेंबर) दहावा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रातील नेते आणि पुढारी त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) नेते आणि विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन केले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेचा (Shivsena) विचार आणि संघटना टिकली पाहिजे, हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असे अजित पवार (Ajit Pawar) यावेळी म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारण आणि राजकारणाची दिशा बदलली आहे. भाजपने (BJP) यात शिवसेनेच्या फुटीर गटाची साथ दिल्याने शिवसेना आणि भाजपात मोठी कटुता आली आहे. शिवसेनेसोबत काँग्रेस (INC) आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) निमित्ताने सोबत आहेत. आज बाळासाहेबांच्या पुण्यतिधीच्या निमित्ताने शिवसेनेचा जन्म आणि त्यांचे मागील अर्धशतक झालेले कार्य याचा पुन्हा नव्याने आढावा घेतला जात आहे. त्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी अभिवादन करत भाष्य केले आहे.

 

अजित पवारांनी ट्वीट करत म्हंटले, ‘शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आज पुण्यतिथी. मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी जीवनभर लढलेल्या, हिंदुत्वाचा नेमका अर्थ समाजाला सांगणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेबांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेचा विचार आणि संघटना टिकली पाहिजे, हीच बाळासाहेबांना खरी आदरांजली ठरेल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या दिनाचे औचित्य साधून बाळासाहेब ठाकरे
यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. तसेच वीर सावरकर (Vinayak Damodar Savarkar)
यांना देखील भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar paid tribute to balasaheb thackeray on his death anniversary

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या उच्च शिक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा, म्हणाले…

Pune Police CP Amitabh Gupta | गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत आवश्यक, नवनियुक्त उपायुक्तांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचा कानमंत्र

Ashish Shelar | सुषमा अंधारे यांनी त्यांचे आडनाव बदलून सुषमा आगलावे करावे – आशिष शेलार

 

Related Posts