IMPIMP

Chandrakant Patil | पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलींच्या उच्च शिक्षणासंदर्भात चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा, म्हणाले…

by nagesh
Chandrakant Patil | Assistance through Social Responsibility Fund for higher education of daughters of police personnel

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात (SP Office) झालेल्या बैठकीत पुणे ग्रामीण पोलीस (Pune Rural Police) दलाचा आढावा घेतला. पोलीस कर्मचाऱ्यांच्या (Police Employee) मुलींच्या उच्च शिक्षणासाठी कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (Social Responsibility Fund) माध्यमातून साहाय्य करण्यात येईल असे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी यावेळी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बैठकीला पोलीस अधीक्षक अंकित गोयल (SP Ankit Goyal) आणि अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (Addl SP Mitesh Ghatte) आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी (Senior Police Officer) उपस्थित होते. यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामकाजाच्या माहितीचे सादरीकरण केले.

 

चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, यावर्षी पोलीस कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन त्यांच्या मुलींना वैद्यकीय (Medical), अभियांत्रिकी (Engineering), नर्सिंग (Nursing) आदी उच्च शिक्षणासाठी आवश्यक खर्चाची माहिती घ्यावी. त्यासाठी तातडीने सामाजिक उत्तरदायित्व निधीतून सहकार्य करण्यात येईल. पुढील वर्षी अधिक व्यापक स्वरूपात मुलींच्या उच्च शिक्षणासाठी (Girls Higher Education) सहकार्य करण्याचे नियोजन करण्यात येईल.

 

महामार्गावरून अपघाताच्या दृष्टीने (Highway Accident) धोकादायक ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट्स) माहिती दिल्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (National Highway Authority (NHA) अथवा संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात येतील. अपघात कमी करण्याच्या उपाययोजनांसाठी आवश्यक असल्यास जिल्हा नियोजन समितीच्या (District Planning Committee) माध्यमातून निधी देण्यात येईल. पोलिसांच्या वाहनांसाठी 2 कोटी रुपये निधी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या दुरुस्ती कामासाठी आवश्यक निधी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तातडीने देण्यात येईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या संदर्भात विशेष लक्ष द्या
पोलिसांनी पुढाकार घेऊन कायदा आणि सुव्यवस्था (Law and Order) राखण्यासाठीच्या उपाययोजना करण्यावर
भर द्यावा. विशेषतः महिला आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या संदर्भात विशेष लक्ष द्यावे.
त्यासाठी विशेष पथकाची स्थापना करावी. अंमली पदार्थांवर प्रतिबंध आणण्यासाठी कडक उपाययोजना करावी.
पोलिसांना गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी आणि पोलीस निवासस्थानांच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे सर्व सहकार्य करण्यात येईल,
असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

Web Title :- Chandrakant Patil | Assistance through Social Responsibility Fund for higher education of daughters of police personnel

 

हे देखील वाचा :

Pune Police CP Amitabh Gupta | गुन्हेगारांमध्ये पोलिसांची दहशत आवश्यक, नवनियुक्त उपायुक्तांना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांचा कानमंत्र

Urfi Javed | खोट बोलून उर्फीकडून साइन केली होती ‘ती’ बोल्ड सिरियल, रडत रडत केल शूटिंग; वाचा संपुर्ण प्रकरण

Shilpa Shetty | ‘मुंह में घुस के फोटो लोगे क्या?’, पापाराझींवर भडकल्याने शिल्पा शेट्टी झाली ट्रोल

 

Related Posts