IMPIMP

Ajit Pawar | अजित पवारांनी राज्य सरकारला दिला सल्ला, ‘शिंदे-फडणवीसांनी त्यांच्या मंत्र्यांना जरा…’

by nagesh
Maharashtra Political News | 'Ajit Dada will do the correct program', Shiv Sena Minister's important statement

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   Ajit Pawar | शेतकर्‍यांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान असो किंवा वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस सारखा प्रकल्प गुजरातला गेल्याचा मुद्दा असो, शिंदे-फडणवीस सरकारमधील (Shinde-Fadnavis Government) मंत्री, आमदार (MLA) सत्ताधारी असूनही अतिशय खालच्या दर्जाच्या टीका-टिपण्णी विरोधकांवर करताना दिसत आहेत. एकुणच महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा दिवसेंदिवस घसरत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्य सरकारला (State Government) सुनावले आहे. यासाठी पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सल्लादेखील दिला आहे. ते पुण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

यावरून अजित पवार म्हणाले, सध्या सत्ताधारी पक्षाचे आमदार एकमेकांवर आरोप करतायत. खोक्यांचा उल्लेख करत आहेत. चौकशीची मागणी करत आहे. आजपर्यंतच्या माझ्या राजकीय जीवनात असे काही घडले नाही. मंत्री आणि अधिकार्‍यांमध्ये समन्वय असायला हवा. इथे मंत्रीच जिल्हाधिकार्‍यांना विचारतायत की ‘तुम्ही दारू पिता का?’ महाराष्ट्रात असे कधीच बघितले नव्हते.

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, शंभर रुपयांत ‘आनंदाचा शिधा’चे गाजर दाखवले. तेव्हाही मी म्हटले की अजून शिधा पोहोचला नाही. शिधाच्या पिशव्यांवर आमदारांनी स्वत:चे फोटो छापून हौस भागवून घेतली. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांशिवाय कुणाचाही फोटो छापायचा नाही असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. इथे त्याचे उल्लंघन झालेय का हे पाहायला हवे.

 

अजित पवार पुढे म्हणाले, सत्ताधार्‍यांनी त्यांच्या मंत्र्यांना जरा मार्गदर्शन करावे की कशापद्धतीने आणि काय विधाने केली पाहिजेत.
आज महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचे ते प्रतिनिधित्व करत आहेत.
त्यांची अशी वक्तव्य आल्यानंतर सर्वसामान्य जनतेने कुणाकडे अपेक्षेने पाहावे? यासंदर्भात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट करावी.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar slams eknath shinde devendra fadnavis on rana bachchu kadu abdul sattar

 

हे देखील वाचा :

Baba Ram Rahim | पॅरोलवर बाहेर आलेल्या बाबा राम रहिमचे नवे गाणे लाँच

Medical Education in Marathi | हिंदीपाठोपाठ आता वैदकीय शिक्षण मराठीतून

Gujarat Election 2022 | निवडणूक आयोगाचा निर्णय ! गुजरातमध्ये विधानसभेपूर्वी 900 अधिकार्‍यांच्या बदल्या, जाणून घ्या कारण

 

Related Posts