IMPIMP

Ajit Pawar | आई-वडिलांना शिव्या देण्याच्या वक्तव्यावरून अजित पवारांनी घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार

by nagesh
NCP Leader Ajit Pawar | ncp leader ajit pawar on chandrakant patil statement about mahatma phule babasaheb ambedkar

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइन  Ajit Pawar | आई-वडिलांना शिव्या द्या पण पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) व शहा यांना काही म्हणून नका असे वक्तव्य करणे दुर्देवी आहे. हे वक्तव्य म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर केली. चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री केल्याने ते नाराज आहेत, अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह (PCMC Commissioner Shekhar Singh) यांच्यासोबत शहरातील विविध समस्यांवर बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, आपण एखाद्या संविधानिक पदावर असल्यानंतर अशा पद्धतीने बोलणे चुकीचे आहे. चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य केल्यामुळे सुसंस्कृतपणा आहे की नाही याची शंका येते. स्वत:च्या आई वडिलांबाबत असे वक्तव्य करणे म्हणजे ‘विनाशकाले विपरित बुद्धी’ आहे.

 

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील…

दरम्यान, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गुरुवारी पुण्यामध्ये पालकमंत्री झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
भाजपाच्या (BJP) या सत्कार समारंभात बोलताना चंद्रकांत पाटलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांचा उल्लेख करत एक विधान केले.
मोदी आणि शाह यांना शिव्या घातलेल्या चंद्रकांत पाटलांना चालणार नाही. आई-वडिलांना शिव्या द्या चालेल
पण मोदी आणि शाहांना शिव्या दिलेल्या चंद्रकांत पाटलांना चालणार नाही असे एका नेत्याने आपल्याबद्दल शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांना सांगितल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawar took notice of chandrakant patal for his speech of scolding his parents

 

हे देखील वाचा :

Pune Crime | दुभाजकाला धडकून १७ वर्षाच्या मुलाचा मृत्यु; बाणेर परीसरातील घटना

Rain in Maharashtra | उद्या पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट, 11 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा हाहाकार

Sharad Pawar | धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, शिवसेना की शिंदे गट, शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

 

Related Posts