IMPIMP

Rain in Maharashtra | उद्या पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ‘येलो’ अलर्ट, 11 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पावसाचा हाहाकार

by nagesh
Rain In Maharashtra | it will rain in maharashtra between 11th and 14th december due to west bengal cyclone

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  – मागील दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने राज्यात जोरदार (Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान उद्या राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला असून पुढचे पाच दिवस राज्यात गडगडाटासह पाऊस (Rain in Maharashtra) पडण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. तसेच सोसाट्याचा वारा देखील वाहण्याची शक्यता आहे. आज राज्यातील मराठवाडा, विदर्भासह, कोकण मध्य महाराष्ट्रात येलो अलर्ट जारी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

उद्या (दि.9) पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, पुणे, ठाणे, अहमदनगर, सोलापूर लातूर, जालना, औरंगाबाद, जळगाव, धुळे, नाशिक नंदूरबार या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
राज्यात 11 ऑक्टोबरपर्यंत पाऊस (Rain in Maharashtra) कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत काही काळ पाऊस तळ ठोकण्याची शक्यता आहे. आज मुंबईमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर पुढचे काही दिवस पावसाच्या मध्यम आणि हलक्या सरी बसरणार आहेत.
दरम्यान 10 ऑक्टोबर नंतरच मान्सून निघून जाईल आणि पावसाळा थांबणार असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुंबई, ठाणे, डोंबिवली आणि परिसरात आज सकाळपासूनच जोरदार पाऊस पडत आहे.
डोंबिवलीमध्ये सकाळपासून 94.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
ठाणे, मुंबई मध्य आणि पूर्व उपनगरातही पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या आहेत.

 

Web Title :- Rain in Maharashtra | rain weather update maharashtra heavy rains in important districts including mumbai kolhapur

 

हे देखील वाचा :

Sharad Pawar | धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार, शिवसेना की शिंदे गट, शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

Jayant Patil | सिल्व्हर ओकवर हल्ला कुणी करायला लावला हे समजलं, जयंत पाटलांचा थेट हल्लाबोल

MP Udayanraje On Govt Officers – Satara News | “काम नाही केलं, तर वाडगं घेऊन..”, उदयनराजेंनी अधिकाऱ्यांना सुनावले

 

Related Posts