IMPIMP

Ajit Pawar | ‘भाकरी फिरवण्याची वेळ आली’ शरद पवारांच्या विधानाचा अर्थ काय? अजित पवारांनी सांगितलं…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawars reaction on sharad pawars statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी मुंबईत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या
(NCP Youth Congress) वतीने आयोजित युवा मंथन कार्यक्रमात बोलताना आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे, असे विधान केले होते. या
विधानाबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आलं. त्यावर पक्षात नवीन चेहरे असले पाहिजेत, तरुणांना संधी मिळाली
पाहिजे, या हेतून शरद पवार बोलले असतील असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

 

 

काय म्हणाले शरद पवार?

आता भाकरी फिरवण्याची वेळ आली असून तव्यावरची भाकरी फिरवावी लागते, ती फिरवली नाही तर करपते, त्यामुळे भाकरी फिरवण्यास विलंब करुन चालणार नाही. समाजात काही व्यक्तिंना पद असो अथवा नसो मात्र त्यांना कार्यकर्त्यांमध्ये सन्मान असतो. तो सन्मान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला पुढील पायरीवर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटलं.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय म्हणाले अजित पवार?

गेल्या 50-60 वर्षाच्या राजकीय जीवनात शरद पवारांनी काही प्रसंग पाहून भाकरी फरिवण्याचे काम केलंय, नवे लोक पुढे आले आहेत हे सगळ्यांनी पाहिलेय, आम्हाला संधी मिळाली आम्ही काम करुन दाखवलं. नवीन कार्यकर्ते आले पाहिजेत, नवे चेहरे आले पाहिजेत. पक्षातील पदाधिकारी असताना त्यात नवे चेहेरे आले पाहिजेत. नवीन लोक पुढे येत आहेत. काहीजण वयस्कर झाल्यावर बाजूला जातात, या घटना घडत राहतात, असंही अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

 

दरम्यान, जयंत पाटील (Jayant Patil) हे देखील राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांनी सूचक विधान केलं होतं. याबाबत अजित पवार यांना विचारलं असत त्यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा म्हणत दोनच शब्दात त्यांनी विषयाला पूर्णविराम दिला.

 

 

Web Title :- Ajit Pawar | ajit pawars reaction on sharad pawars statement

 

हे देखील वाचा :

Pune PMC 24×7 Water Scheme | सूस, म्हाळुंगे या गावात समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येणार

Social Welfare Assistant Commissioner Sangeeta Dawkhar | महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आणि कार्य नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : सहायक आयुक्त संगीता डावखर

Ajit Pawar | राज ठाकरेंच्या सल्ल्याला अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘जसे त्यांनी त्यांच्या काकांकडे…’

 

Related Posts