IMPIMP

Ajit Pawar And Jayant Patil | सांगलीत अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या स्वतंत्र गटांमधील अंतर्गत छुपी स्पर्धा चर्चेत

by nagesh
Ajit Pawar And Jayant Patil | cold war between ncp leader ajit pawar and jayant patil is at peak in sangali district

सांगली : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar And Jayant Patil | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा नुकताच सांगली (Sangli News) दौरा पार पडला. सांगलीत दिवसभर कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी फक्त त्यांच्यासोबत एकाच कार्यक्रमाला हजेरी लावताना दिसले. त्यामुळे स्वताला लांब ठेवल्यानं अजित पवार आणि जंयत पाटील यांच्या स्वतंत्र गटांमधील अंतर्गत छुपी स्पर्धा चव्हाट्यावर आल्याची चर्चा रगंताना दिसत आहे. (Ajit Pawar And Jayant Patil )

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सांगलीतील कार्यक्रमादरम्यान अजित पवार यांच्या आसपास मोजकेच कार्यकर्ते पाहायला मिळाले. त्यावेळी जयंत पाटील यांच्या जवळचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मात्र लांब राहण्यास पसंद केल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, त्यावेळी सांगलीत अजित पवार यांच्या उपस्थित अनेक कार्यक्रम होते. अजित पवार दिवसभर जिल्ह्यात होते. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी देखील पवार आले होते. (Ajit Pawar And Jayant Patil)

 

त्यावेळी विवाह सोहळ्यादरम्यान अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. दोघांत स्वतंत्र संवादही घडला. लग्न सोहळा आटोपल्यानंतर जेवन न करता थेट सांगलीतील महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या घरी जेवणासाठी रवाना झाले. या दरम्यान, अजितदादांच्या कार्यक्रमात जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची अनुपस्थिती लक्षणीय ठरत होती.

 

कार्यक्रमाच्या दुस-या दिवसी अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळीही जंयत पाटील यांची उपस्थिती नव्हती.
त्यावेळी सांगलीतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित दिसले.
जैन सभेच्या अधिवेशनाचा कार्यक्रम झाल्यानंतर अजित पवारांचा मिरजेत यशवंतराव चव्हाण भूषण पुरस्कार सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना प्रदान करण्याचा कार्यक्रम होता.
यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील, जयश्री पाटील, आ. अनिल बाबर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतही पालकमंत्री जंयत पाटील यांचे नाव असूनही ते उपस्थित राहिले नाहीत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अजित पवार यांच्या कार्यक्रमात जंयत पाटील यांचे असणारे कार्यकर्ते त्यावेळी पुढे पुढे करताना दिसले नाही.
जे ते कार्यक्रमात करत होते. दरम्यान, अजित पवार असूनही अंतर ठेवल्याचे सर्वांना जाणवत होते.
सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर जयंत पाटील यांची मोठी पकड आहे.
ते आपल्या राजकीय डावपेचातून विरोधी पक्षातीलच नाहीतर स्वपक्षाच्या नेत्यांनाही नमोहरम करताना सांगलीने यापूर्वी पाहिलेले आहे.
जिल्ह्यात भाजपाचा वाढलेल्या विस्तारामागेही त्यांनी आतून पुरवलेल्या या ताकदवादाची उघड गुपिताप्रमाणे चर्चा होत असते.
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या एक जुना संघर्ष आहे. याच मुद्द्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरली आहे.

 

Web Title :- Ajit Pawar And Jayant Patil | cold war between ncp leader ajit pawar and jayant patil is at peak in sangali district

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील अट्टल गुन्हेगार नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध, MPDA कायद्यान्वये CP अमिताभ गुप्तांची 66 जणांवर कारवाई

Aba Bagul | खासगी शाळांमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मोफत द्या, काँग्रेसचे नेते आबा बागुल यांची मागणी

Pune Pimpri Crime | पतीच्या विम्याचे पैसे फ्लॅट खरेदीसाठी गुंतवले, बिल्डरने घातला गंडा; अनेकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डर पत्नीवर FIR

 

Related Posts