IMPIMP

Ajit Pawar | अधिवेशनात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar reply to devendra fadnavis on the issue of sambhaji maharaj

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस सुद्धा विरोधकांच्या घोषणाबाजीने सुरू झाला. अधिवेशनात विविध मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले. अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात होताच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळातील विकासकामाला स्थगिती दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावरून अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी झाली. अजित पवार विकासकामांना स्थगिती दिल्याच्या मुद्द्यावर आक्रमक झाले होते.

 

सत्ताधाऱ्यांविरोधात महाविकास आघाडीचे आमदार वेलमध्ये उतरले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी, स्थगिती सरकार हाय हाय, 50 खोके एकदम ओके’, अशा घोषणा विरोधकांकडून यावेळी देण्यात आल्या. अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्थगितीचा मुद्दा उचलून धरला असता, त्यावर देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दांत अजित पवारांना उत्तर दिले. तुम्ही सात वेळा आमदार म्हणून निवडून आलात. आम्ही कमी वेळा निवडून आलो. पण काही गोष्टी आम्ही तुमच्याकडून शिकलो. ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार आले, तेव्हा तुम्ही आमच्या सर्व विकासकामांवर रोख लावला होता, असे फडणवीस म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तुम्ही जरी आमच्यावर अन्याय केला, तरी आम्ही तुमच्यावर अन्याय करणार नाही.
आम्ही आवश्यक त्या सर्व स्थिगित्या उठवल्या आहेत. जिथे गरज आहे, तिथेच स्थगित्या ठेवल्या आहेत.
लवकरच त्या संदर्भातही योग्य निर्णय घेतला जाईल. आम्ही विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष असा भेद करत नाही.
कुणावरही अन्याय केला गेला नाही. आम्ही तुम्हालाही त्याची माहिती देऊ, असे फडणवीसांनी नमूद केले.
माझ्या स्वत: च्या मतदार संघातील कामे महाविकास आघाडीच्या सरकारने रोखली होती.
आम्हाला गेल्या अडीच वर्षात एक नवा पैसा दिला नाही. आम्ही बदल्याची भावना ठेवली नाही.
आम्ही 70 टक्के स्थगित्या उठवल्या आहेत. 30 टक्के स्थगित्या काही तरतुदींमुळे कायम ठेवल्या गेल्या आहेत.
त्यावरही निर्णय घेऊन लवकरच त्या देखील उठवल्या जातील, असे फडणवीसांनी नमूद केले.

 

Web Title :- Ajit Pawar | devendra fadnavis slams ajit pawar in maharashtra assembly winter session

 

हे देखील वाचा :

Gram Panchayat Election | ग्रामपंचायत निवडणुकीत दीपक केसरकरांना ठाकरे गटाचा दणका

Sanjay Raut | देवेंद्र फडणवीस यांच्या ‘त्या’ दाव्यावर संजय राऊतांचा खोचक टोला, म्हणाले-‘नैरोबी-केनियाला देखील… ‘

Poonam Pandey | ‘बेशरम रंग’ गाण्यावर थिरकली पूनम पांडे; कातील अदांनी चाहते घायाळ…

Winter Session -2022 | महाविकास आघाडीची आजही ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…

 

Related Posts