IMPIMP

Ajit Pawar Meets Eknath Shinde | शिंदे-फडणवीस सरकारकडून बारामतीमधील विकासकामांना स्थगिती ?; अजित पवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

by nagesh
Ajit Pawar Meets Eknath Shinde | ncp leader ajit pawar meets cm eknath shinde after govt give stay urban development 941 crores project

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar Meets Eknath Shinde | शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) स्थापन होताच महाविकास आघाडीच्या अनेक कामांना स्थगिती दिली. तसेच अनेक निधी रोखला आहे. या नव्या सरकारने काही तासांपूर्वीच नगरविकास खात्याने मंजूर केलेल्या 941 कोटी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली होती. यापैकी 245 कोटींची विकासकामे एकट्या बारामती नगरपरिषदेतील (Baramati Municipal Councils) होती. मात्र, या कामांना स्थगिती देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, आता अजित पवार हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि अजित पवार यांनी आज (सोमवार) राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मतदान केले आहे. त्यानंतर लगेच अजित पवार हे मुख्यमंत्री कार्यालयात एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. त्यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), धनंजय मुंडे (Dhananjay Munde) आणि हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) देखील होते. आता अजित पवार मुख्यमंत्र्यांमध्ये काय संवाद होणार ? याबाबत राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारने नगरविकास खात्यामधील 941 कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती.
या विकासकामांसाठी मार्च ते जून 2022 दरम्यान निधी मंजूर केला होता.
या 941 कोटींपैकी 245 कोटींचे वितरण एकट्या बारामती नगरपरिषदेला झाले होते. आता ही सर्व कामे स्थगित करण्यात आली होती.

 

Web Title :- Ajit Pawar Meets Eknath Shinde | ncp leader ajit pawar meets cm eknath shinde after govt give stay urban development 941 crores project

 

हे देखील वाचा :

Indore-Pune Bus Accident | इंदूरहून पुण्याकडे येणाऱ्या बसला भीषण अपघात; 13 प्रवाशांचा मृत्यू

GST Rates Hike | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! जीवनावश्यक वस्तूंसोबत ‘या’ वस्तूही महागणार; जाणून घ्या

Attack On BJP Leader In Mumbai | मुंबईत भाजपच्या महिला नेत्यावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ

 

Related Posts