IMPIMP

Attack On BJP Leader In Mumbai | मुंबईत भाजपच्या महिला नेत्यावर भर रस्त्यात जीवघेणा हल्ला; परिसरात खळबळ

by nagesh
Attack On BJP Leader In Mumbai | bjp leader sultana khan attacked by unknown person in mumbai crime news

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन  Attack On BJP Leader In Mumbai | भाजपच्या महिला नेत्यावर जीवघेणा हल्ला (Attack On BJP Leader In Mumbai) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भर रस्त्यात कार थांबवून धारदार शस्त्राने वार करत दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर हल्ला केला आहे. भाजपच्या अल्पसंख्याक महिला प्रदेशाध्यक्षा सुलताना समीर खान (Sultana Sameer Khan) यांच्यावर काल रात्री मुंबईच्या भाईंदरमध्ये जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

याबाबत अधिक माहिती अशी की, नया नगर पोलीस ठाण्याच्या (Naya Nagar Police Station) अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुलताना समीर खान या आपल्या कारमधून दीपक हॉस्पिटलच्या दिशेने जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कारवर हल्ला केला. या हल्ल्यात कारच्या खिडकीच्या काचा फुटल्याने त्या जखमी झाल्या आहेत. हल्ल्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरीकांच्या मदतीने त्यांना मीरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयात (Indira Gandhi Hospital) नेण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Attack On BJP Leader In Mumbai)

सुलताना खान यांच्या पतीने सांगितले की, रात्री 11.15 च्या सुमारास ते पत्नीसह डॉक्टरांना भेटायला जात
असताना मीरा रोड परिसरात 2 दुचाकीस्वारांनी येऊन त्यांची दुचाकी कारसमोर उभी केली.
त्यांनी शिवीगाळ करत धारदार शस्त्राने वार केले. दरम्यान, या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात
खळबळ उडाली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस (Police) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

Web Title :- Attack On BJP Leader In Mumbai | bjp leader sultana khan attacked by unknown person in mumbai crime news

 

हे देखील वाचा :

GST Rates Hike | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! जीवनावश्यक वस्तूंसोबत ‘या’ वस्तूही महागणार; जाणून घ्या

Pune Minor Girl Rape Case | स्कुल बसचालकाचा बसमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; रिलेशनशीपमध्ये राहणार का विचारून केला लैंगिक अत्याचार

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

 

Related Posts