IMPIMP

GST Rates Hike | सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री ! जीवनावश्यक वस्तूंसोबत ‘या’ वस्तूही महागणार; जाणून घ्या

by nagesh
GST | taxpayers with turnover more than 2 crore file gstr 9 gstr 9c before 31 december

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन GST Rates Hike | आजपासून म्हणजे 18 जुलैपासून खाद्यपदार्थांसह अन्य वस्तूंवरील आणि सेवा करामध्ये (GST) वाढ झाली आहे. त्यामुळे आजपासून अनेक वस्तूंसाठी अधिक पैसे मोजावे (GST Rates Hike) लागणार आहे. जीएसटी परिषदेने (GST Council) आजपासून नवे दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

 

18 जुलैपासून जीएसटी परिषदेच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. यामध्ये पीठ, पनीर आणि दही यांसारख्या प्री-पॅकेज केलेल्या वस्तू आणि लेबल असलेल्या खाद्यपदार्थांचा समावेश आहे, ज्यावर 5 टक्के जीएसटी लागू होईल. आता 5 हजार रुपयांपेक्षा अधिक भाड्याने असलेल्या हॉस्पिटलच्या रूमवरही जीएसटी भरावा लागणार आहे. तसेच, अनपॅक केलेले, लेबल नसलेले आणि ब्रँड नसलेल्या वस्तूंना जीएसटीमधून सूट मिळणार आहे. (GST Rates Hike)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मासे, दही, पनीर, लस्सी, मध, मखाना, सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता 5 टक्के जीएसटी लागू होईल. त्याचबरोबर जैव-वैद्यकीय कचऱ्यावर (Biomedical Waste) प्रक्रिया करण्यासाठी अथवा त्याची विल्हेवाट लावण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रक्रियेच्या सुविधेवर 12 टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे.

 

दरम्यान, प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने,
पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागणार असल्याने मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टी आता महाग होणार आहे.

 

Web Title :- GST Rates Hike | gst new rates applicable from 18 july 2022

 

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | स्कुल बसचालकाचा बसमधील अल्पवयीन मुलीवर बलात्कार; रिलेशनशीपमध्ये राहणार का विचारून केला लैंगिक अत्याचार

Gold Silver Price Today | जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे दर

Maharashtra Rains Update | राज्यात पावसाची रिपरिप सुरूच; आतापर्यंत 104 जण दगावले, मुंबईला ‘यलो अलर्ट’

 

Related Posts