IMPIMP

Ajit Pawar | “काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या… “; अजित पवारांचे स्पष्टीकरण

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar has criticized a statement of bjp state president chandrashekhar bawankule over baramati

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – मागील काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नसलेले विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे पुन्हा एकदा सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले आहेत. ते सामाजिक जीवनात नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP ) नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मागील काही दिवसांच्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिर्डी येथे पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरात अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजारी असताना सुद्धा उपस्थित राहिले होते, पण अजित पवार तेथे नसल्याने चर्चेला अधिकच उधाण आले होते. ‘पाच दिवस आजारी होतो. खोकला सुरू झाला होता, त्यात प्रकृती बरी नव्हती. आता तब्येत बरी आहे. पण काहीही बातम्या सुरू झाल्या होत्या,’ असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

 

अजित पवार (Ajit Pawar) अनेक दिवस अनुपस्थित असल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती. पण आता त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर या चर्चांना पूर्ण विराम लागेल.

 

अजित पवार पुढे म्हणाले,’गेली चार-पाच वर्षे मी परदेशात गेलो नव्हतो. त्यामुळे 4 नोव्हेंबर रोजी मी परदेशात
गेलो आणि काल मध्यरात्री मी पोहचलो. थकलो होतो, पण आज ही इथं आलो नसतो तर आणखी वेगळ्याच
बातम्या लागल्या असत्या. दादा इथं आले, दादा इथं नाही आले, दादा गायब झाले, दादा नाराज झाले.
काहीही बातम्या सुरू होत्या. वारेमाप चर्चा करायची. दादा वाचून ह्यांचं काय नडते काय कळत नाही.
दादाला काही खाजगी आयुष्य आहे की नाही? असा प्रश्न ही त्यांनी विचारला.
अजित पवार अनेक दिवस अनुपस्थित असल्याने ते नाराज असल्याची चर्चा रंगू लागली होती.
पण आता त्यांच्या या स्पष्टीकरणानंतर या चर्चांना पूर्ण विराम लागेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar clarify on absence in public appearance since last some days

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 79 वर्षाच्या ‘शौकीन’ वृध्दास ‘डेटींग’ची हौस पडली 17 लाखांना, जाणून घ्या वारजे माळवाडीमधील प्रकरण

Pune Crime | पतीनेच दीराबरोबर संबंध ठेवायला सांगितले; नकार दिल्याने विवाहितेला केली मारहाण, हडपसर परिसरातील घटना

Udayanraje Bhosale | “इतिहास जिवंत ठेवायचा असेल तर…”; उदयनराजे भोसलेंचा सरकारला सल्ला

 

Related Posts