IMPIMP

Ajit Pawar | अजित पवारांचा भांडखोर महंतांना जोरदार टोला; म्हणाले – ‘..यांचा राडा पाहून हनुमानही डोक्यावर हात मारून घेत असेल’

by nagesh
Ajit Pawar | ncp mahesh tapase on shinde faction deepak kesarkar statement over ajit pawar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Ajit Pawar | एक साधूंचा गट म्हणतो हनुमानाचा जन्म (Birth of Hanumana) हा किष्किंधामध्ये (Kishkindha) झाला तर दुसरा गट म्हणतो की, अंजनेरी (Anjaneri) येथे हनुमानाचा जन्म झाला आहे. यावरुन नाशिकमध्ये वादंग निर्माण झाला आहे. यावेळी साधु महंतामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया देत चांगलेच कडाडले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

“यांचं हे रुप आणि हे वागणं बघून हनुमानानेही कपाळावर हात मारून घेतला असेल” असं वक्तव्य अजित पवार यांनी केलं आहे. तसेच, “साधू, महंतांचा स्वभाव हा शांत असतो. महंतांनी गप्प बसावं तर हे ते माइक घेऊन एकमेकांना मारताहेत आणि आपण त्यांना महंत, महाराज म्हणतो,” असा त्यांनी टोला लगावला. पुढे ते म्हणाले, ‘कोण म्हणतोय मारुती येथे जन्माला आला तर कोण म्हणतोय मारुती येथे जन्माला आला. अरे तुम्हाला शनिवारी दर्शनाला जायचे आहेच ना आणि महंत महंत म्हणता आणि माईक घेऊन मारायला उठताय,’ असं म्हणत तुफान फटकेबाजी अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.

 

राणा दाम्पत्यालाही टोला..
“काही व्यक्ती संस्था, संघटनांकडून जातीच्या धर्माच्या नावनं विष पेरणं सुरू आहे, शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला,
कोण आहेत या शक्ती ? कुणाचा हात यामागे आहे ?” असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.
तर कुणीही उठायचं आणि कुठं जायचं आणि हनुमान चालीसा म्हणायचं,
मी जर म्हणलो भोसरीत जाऊन अजित गव्हाणेंच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणणार तर चालेल का ? मला माझं काठेवाडीच घर आहे,
फारफार तर मुंबई मधील देवगिरीचं घर आहे, तिथं हनुमान चालीसा म्हणता येईल, कुणालाही आपल्या कृती मुळे त्रास होता कामा नेये,” असं ते म्हणाले.

 

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar says that hanuman may have hit on the head after seen dispute of sadhu mahant

 

हे देखील वाचा :

Ajit Pawar | ‘अरे मी मराठी भाषेत सांगितलंय’, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकारांना खडसावलं

High BP | हायपरटेन्शन म्हणजे काय, जाणून घ्या उच्च रक्तदाबाची लक्षणं, कारणं आणि उपाय

Aether Industries Chemical Company-IPO | एथर इंडस्ट्रीज जबरदस्त एन्ट्री ! तेजीच्या रसायनाने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी; जाणून घ्या

 

Related Posts