IMPIMP

Ajit Pawar | “परिस्थिती अशीच राहिली तर राज्याचं चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही…”; अजित पवारांचा इशारा

by nagesh
Ajit Pawar | police and officers in mantralaya in the state under tension due to shinde fadnavis government alleges opposition leader ajit pawar

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   विरोधी पक्षनेता अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. यावेळी अजित पवारांनी आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) प्रकरण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी, ओला दुष्काळ आणि हर हर महादेव चित्रपटावरुन सुरु असलेला वाद आदी मुद्दे चर्चिले. अजित पवारांनी (Ajit Pawar) पत्रकार परिषदेत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारवर विविध मुद्द्यांवरुन हल्लाबोल केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

सत्ताधाऱ्यांमुळे पोलीस विभाग आणि मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारीवर्ग तणावाखाली काम करत आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांना थेट सीएमओमधून आदेश येत असल्याचा आरोप त्यांनी केला. पवार म्हणाले, “शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadanvis Government) स्थापन झाल्यापासून प्रशासनात म्हणावे तसे काम होताना दिसत नाही. प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर संपूर्ण राज्याचा लोड होता, नंतर मंत्रिमंडळ विस्तार करुन 18 लोकांना मंत्रिमंडळात घेतले. महाराष्ट्रातील पोलीस (Maharashtra Police Department ) आणि प्रशासन देशातील सर्वोत्तम असल्याचं म्हटलं जाते. पण सरकार आल्यापासून पोलीस विभाग प्रचंड दबावाखाली काम करत आहे. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरुन आदेश येतात आणि अन्याय होत असला तरी पोलीस बोलून दाखवतात की आमचा नाईलाज आहे.’

 

पुढे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, “पोलीस सांगतात त्यांच्यावर दबाव आहे.
हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. पोलीस विभाग आणि मंत्रलायतील सचिव दर्जाचे आणि इतर कर्मचारी तणावात काम करतात.
त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातून थेट आदेश येतात. जनतेचा आजही पोलीस आणि प्रशासनावर विश्वास आहे.
गेल्या चार महिन्यांपासून सुरु झालेली परिस्थिती अशीच राहिली, तर राज्याचं चित्र गंभीर व्हायला वेळ लागणार नाही.”

 

 

Web Title :- Ajit Pawar | police and officers in mantralaya in the state under tension due to shinde fadnavis government alleges opposition leader ajit pawar

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | तुला मस्ती आली का? जावयाने केला सासूचा विनयभंग; चिखली परिसरातील घटना

Pimpri Traffic News | पिंपरीत कार्तिकी यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल

Cricketer Shubman Gill | “सारा दा सारा सच बोल दिया”, क्रिकेटर शुभमन गिलने अभिनेत्री सारा सोबतच्या नात्याचा केला मोठा खुलासा

Pune Accident | कॅमेरात कैद झाल्या ठिणग्या; पुणे-अहमदनगर महामार्गावर एक भयानक अपघात

 

Related Posts