IMPIMP

Ambadas Danve | ‘शिवसेनेचे हिंदुत्व सोडलेले लोक आता भाजपकडून हिंदुत्वाचे धडे घेत आहेत’ – अंबादास दानवे

by nagesh
Ambadas Danve On CM Eknath Shinde | 'Eknath Shinde had an idea that the Nagpur land scam case had been brought to justice' - Ambadas Danve Ambadas Danve On CM Eknath Shinde | 'Eknath Shinde had an idea that the Nagpur land scam case had been brought to justice' - Ambadas Danve

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शिंदे गटातील आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.
त्यावर शिवसेनेचे आमदार आणि विधान परिषद विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटाला टोला लावला आहे.
शिवसेनेतून पळून गेलेल्या आमदारांना भाजप हिंदुत्व सांगत असेल, तर ही सर्वात मोठी हस्यास्पद गोष्ट आहे, असे अंबादास दानवे (Ambadas Danve)
म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वीर सावरकर असोत किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत, यांचे हिंदुत्व शिवसेनेतून ४० गद्दार फुटले त्यांना भाजप सांगत असेल, तर ही हास्यास्पद गोष्ट आहे. तुम्ही ४० जण शिवसेनेत होता, शिवसेना प्रमुखांचे हिंदुत्व या महाराष्ट्राला नव्हे, तर देशाला दिशा देणारे आहे. या देशात हिंदू म्हणून सन्मानाने जगायला, हिंदू म्हणून मतदान करायला जर कोणी शिकवले असेल, तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिकविले. एवढे हिंदुत्वाचे आपल्याला बाळकडू मिळालेले असताना, भाजपाच्या नेत्यांकडून हे जर हिंदुत्वाचे धडे घेत असतील, तर यापेक्षा मोठे दुर्दैव कोणतही नाही, असे अंबादास दानवे (Ambadas Danve) म्हणाले.

 

बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करण्यासाठी कोणी येणार असेल, तर चांगली गोष्ट आहे.
पण, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रातारणा केली, ज्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेशी गद्दारी केली,
बाळासाहेबांची शिवसेना गद्दारी करुन तोडली. ते लोक आता भाजपसोबत गेले आहेत.
ते आता बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन करत आहेत.
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि संघटना तोडली आहे.
हा केवळ दिखावा आहे, असेही यावेळी अंबादास दानवे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ambadas Danve | if they are going to learn hindutva from bjp leaders then it is bad luck ambadas demons target shinde group

 

हे देखील वाचा :

Pune Crime | …म्हणून मुलानं केलं आईसोबत भयंकर कृत्य; पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना

Eknath Khadse | ‘हिंमत असेल तर पूर्ण ताकदीने लढा’ – एकनाथ खडसे

Vinayak Mete Accident Case | विनायक मेटे मृत्यूप्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई, चालकाविरोधात FIR

 

Related Posts