IMPIMP

Eknath Khadse | ‘हिंमत असेल तर पूर्ण ताकदीने लढा’ – एकनाथ खडसे

by nagesh
Eknath Khadse NCP agitation against Girish Mahajan

जळगाव : सरकारसत्ता ऑनलाईन  जळगाव दूध संघात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप संचालक महेश लिमये (Mahesh Limaye) यांनी केला आहे. या दूध संघाच्या संचालिका राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Mandakini Khadse) आहेत. त्यामुळे सर्व बाजुंनी सत्ताधारी भाजप खडसेंवर आरोप करत आहेत. एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) सर्वांना प्रत्युत्तर दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकनाथ खडसे म्हणाले, लढायचे असेल, तर ताकदीने लढा. लहान पोरांसारखे लढू नका. तसेच जिल्हा दूध संघात भ्रष्टाचार दिसत असेल, तर फॉरेन्सिक ऑडिट करा. माझी तयारी आहे. यातून जे निष्पण्ण होईल, त्याला मी सामोरा जाईन. निवडणुका पाहून विरोधकांनी हे प्रकरण समोर आणले आहे. त्यामुळे त्यांनी अटक सत्र राबविले आहे.

 

यावेळी जळगाव दूध संघाची ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे खडसेंनी स्पष्ट केले. त्यासाठी 41 अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदारांचा आमच्या बाजुने प्रतिसाद आहे. 451 पैकी 448 सभासदांशी मी स्वत बोललो आहे. सध्या विरोधकांकडून ज्याप्रकारचे राजकारण सुरु आहे, त्यातून जनतेच्या मनात मोठी चीड आहे.

त्याचा प्रत्यय त्यांना आगामी निवडणुकांत येईलच.
यांच्याजवळ आमदार खासदार असताना देखील दूध संघ ताब्यात घेण्यासाठी मोठे घाण्यारडे राजकारण सुरु आहे.
विरोधकांना त्रास देण्यासाठी सत्तेचा दुरुपयोग सुरु आहे, असे देखील यावेळी खडसे म्हणाले आहेत.

 

राष्ट्रवादीचे बंडखोर नेते संजय पवार (Sanjay Pawar) हे विरोधकांकडून जळगाव दूध संघाची निवडणूक
लढविणार आहेत. त्यांच्यावर देखील खडसेंनी टोला लावला. संजय पवार म्हणजे पूर्ण राष्ट्रवादी नाही.
एकटे संजय पवार आम्हाला सोडून गेले, म्हणजे पूर्ण राष्ट्रवादी पक्ष सोडून गेलेला नाही, असे खडसे यावेळी म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Eknath Khadse | if you want to fight fight with strength eknath khadse targets the girish mahajan

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वेश्यागमनासाठी जाणार्‍या दोघा तरुणावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; फरासखाना पोलीस ठाण्यात FIR

Vinayak Mete Accident Case | विनायक मेटे मृत्यूप्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई, चालकाविरोधात FIR

Urfi Javed | ‘जा अपना मुंह देख’, उर्फीने स्प्लिट्सव्हिलामधील स्पर्धकाला दिले चोख प्रत्युत्तर

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार रविंद्र ढोले व त्याच्या साथिदारावर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 107 वी कारवाई

 

Related Posts