IMPIMP

Vinayak Mete Accident Case | विनायक मेटे मृत्यूप्रकरणी सीआयडीची मोठी कारवाई, चालकाविरोधात FIR

by nagesh
Vinayak Mete Accident Case | cid get proof against driver in vinayak mete accident death case

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   Vinayak Mete Accident Case | शिवसंग्राम संघटनेचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. अपघात प्रकरणी मेटे (Vinayak Mete Accident Case) यांच्या चालकावर (Driver) भरधाव आणि बेदरकापणे गाडी चालविल्या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. रसायनी पोलीस ठाण्यात (Rasaani Police Station) नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (Navi Mumbai CID) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे चालकाला अटक (Arrest) होण्याची शक्यता आहे. विनायक मेटे अपघात प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत केला जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोज पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai-Pune Express Highway) भीषण अपघात (Vinayak Mete Accident Case) झाला होता. त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) दाखल केलं होतं. मात्र तिथे विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली होती. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी मेटे यांच्या मृत्यूची सखोल चोकशी करण्यात येईल असे जाहीर केले होते. तसेच काही दिवसांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajnish Seth) यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी (CID Investigation) करुन आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले होते.

 

सीआयडी या प्रकरणाची चौकशी करत होती. मेटे यांची कार ज्या ज्या मार्गावरून गेली होती तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेज सीआयडी तपासत होते. याशिवाय आयआरबीचे इंजिनिअर्स (IRB Engineers) आणि टेक्निकल अभियंते (Technical Engineers) यांचं एक पथक तयार करुन त्यांचं मत जाणून घेण्यात आलं होतं. यामध्ये कोणाची चूक तुम्हाला दिसते? सीआयडीने पाहिलेल्या फूजेटमध्ये चालक ताशी 120 ते 140 किमी वेगाने गाडी चालवत असल्याचे दिसत होते.

 

ज्या ठिकाणी विनायक मेटे यांच्या गाडीचा अपघात झाला त्याच्या थोडा वेळ आधी चालक एकनाथ कदम
(Driver Eknath Kadam) याने उजवा टर्न घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता.
आपल्याला ओव्हरटेक करता येणार नाही हे माहित असूनही त्याने ओव्हरटेक केला आणि त्याचा परिणाम
डाव्या बाजूला झाला आणि अपघात झाला. सीआयडीच्या तपासात या सर्व बाबी समोर आल्यानंतर त्यांनी
रसायनी पोलिसांमध्ये एकनाथ कदम याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Vinayak Mete Accident Case | cid get proof against driver in vinayak mete accident death case

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde Group | सोलापुरात एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला धक्का, शरद पवारांचा अत्यंत जवळचा माणूस ‘शिवसेने’त

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार रविंद्र ढोले व त्याच्या साथिदारावर ‘मोक्का’, आयुक्त अमिताभ गुप्तांची आजपर्यंतची 107 वी कारवाई

Shradha Walker Murder Case | दिल्ली मर्डर प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळेची पोस्ट चर्चेत ; मेरा अबदुल ऐसा नही म्हणत…

 

Related Posts