IMPIMP

Amit Shah | पश्चिम महाराष्ट्रात भाजपकडून राजकीय फेरबांधणी, अमित शहांचा कोल्हापूर दौरा

by nagesh
Amit Shah | shraddha murder case delhi police will ensure strictest punishment for shraddhas killer amit shah on aftab poonawala

कोल्हापूर : सरकारसत्ता ऑनलाइन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे कोल्हापूरच्या (Kolhapur) दौऱ्यावर येणार आहेत. जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या (Jawahar Shetkari Sahakari Sakhar Karkhana) नामविस्तार समारंभासाठी अमित शाह (Amit Shah) येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) यांनी दिली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हातकणंगले तालुक्यातील चांदीनगरी हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे नाव बदलून ‘कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना’ (Kallappanna Awade Jawahar Shetkari Sahakari Sakhar Karkhana) असे करण्यात आले आहे. हा नामविस्तार समारंभ केंद्रीय मंत्री केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे संचालक आमदार आवाडे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये दिली.

 

जिल्हा काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आवाडे यांनी विधानसभेची निवडणूक (Legislative Assembly Election) त्यांच्या ताराराणी आघाडीच्या माध्यमातून अपक्ष लढवली होती. त्यात विजयी झाल्यानंतर त्यांनी राज्यातील भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत भाजपला पाठिंबा दर्शवला होता.यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi Government) स्थापन झाले. आघाडी सरकारकडून पुरेशी मदत, सहकार्य केले जात नाही, असे ते पत्रकार परिषद, जाहीर समारंभ, मंत्र्यांच्या उपस्थितीत अनेकदा त्यांनी हे बोलून सुद्धा दाखवले होते.

 

यादरम्यान आवाडे यांनी जवाहर कारखान्याच्या नामविस्तारासाठी केंद्रीय मंत्री शाह यांना निमंत्रित करणार असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाबद्दल त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या प्रमुखांची चर्चा झाली आहे.
परतीचा पाऊस संपल्यानंतर हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
याच वेळी आमदार आवाडे हे भाजपमध्ये प्रवेश करतील असा तर्क लावला जात आहे.
तसेच पश्चिम महाराष्ट्रात भाजपची पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
त्यामुळे केंद्रीय मंत्री शाह यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या खूप महत्वपूर्ण असणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Amit Shah | Political restructuring by BJP in Western Maharashtra, Amit Shah’s visit to Kolhapur

 

हे देखील वाचा :

MCA Election | मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत चुरस, संदीप पाटील यांचे आशिष शेलार-पवारांना थेट आव्हान

Maharashtra Crime News | रागाने केला घात! पती – पत्नीचा वाद विकोपाला गेल्याने पतीने उचलले ‘हे’ पाऊल

Satara Crime | फलटण येथील अकॅडमीवर सैन्यातील अधिकाऱ्यांचा छापा, बोगस कागदपत्रे-प्रमाणपत्रे जप्त

 

Related Posts