IMPIMP

Amol Mitkari | चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रया; म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांनी मंत्रिपदासाठी भीक…’

by nagesh
Amol Mitkari | amol mitkari reply chandrakant patil statement on mahatma phule dr babasaheb ambedkar and karmveer bhaurao patil

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरू केल्या. त्यांना शाळा सुरू करण्यासाठी सरकारने अनुदान दिले नाही, तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. त्यांनी भीक मागून शाळा चालवल्या होत्या, असे विधान उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले होते. पैठणमधल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी शाळांना देण्यात येणाऱ्या अनुदानावरून महापुरुषांचा दाखला देत असताना हे विधान केले. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी संताप व्यक्त केला आहे. महापुरुषांनी भीक मागून नाही, तर लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून शाळा काढल्या होत्या. चंद्रकांत पाटलांचे विधान चुकीचे आहे. त्यांनी मंत्री पदासाठी भीक मागितली होती, असे अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले.

 

चंद्रकांत पाटलांच्या ‘भीक मागितली’ या शब्दावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी पाटलांवर टीका केली आहे. भाजपमध्ये वाचाळवीर आहेत, हे चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकवर्गणी आणि लोकसहभागातून शाळा उभारल्या होत्या. स्वत:जवळील पैसेही या महापुरुषांनी शाळांसाठी खर्च केले. त्यांनी भीक मागितली नव्हती. भीक म्हणून तीनही महापुरुषांचा अपमान चंद्रकांत पाटील यांनी केला आहे, असे अमोल मिटकरी यांनी नमूद केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नवीन शाळा सुरू करणाऱ्या संस्थाचालकांना तुम्ही भीक मागा, असा अजब सल्लाच चंद्रकांत पाटील यातून देत आहेत.
फुले-शाहू-आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेने चंद्रकांत पाटील यांच्या विधानाकडे गांभीर्याने पाहावे.
चंद्रकांत पाटलांचे हे विधान अत्यंत भिकारपणाचे आहे. तुमच्यासारखे भिकार** आमचे महापुरुष नव्हते.
तुम्ही मंत्रिपदासाठी काय भीक मागितली, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे.
चंद्रकांत पाटलांचे विधान महापुरुषांचा अपमान करणारे आहे. अशा लोकांना धडा शिकवण्याची योग्य वेळ आली आहे,
असेही मिटकरी म्हणाले.

 

Web Title :- Amol Mitkari | amol mitkari reply chandrakant patil statement on mahatma phule dr babasaheb ambedkar and karmveer bhaurao patil

 

हे देखील वाचा :

Bhagat Singh Koshyari | मी स्वत:ला राज्यपाल मानत नाही – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

Pune News | ‘महाराष्ट्र केसरी’चा अधिकृत मान ‘संस्कृती प्रतिष्ठान’कडेच!; भारतीय कुस्ती महासंघाने दिले आयोजनाच्या जबाबदारीचे पत्र; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

Nashik Accident | नाशिकमध्ये अपघातांचे सत्र सुरूच; सिन्नरच्या मोहदरी घाटात तीन गाड्यांचा विचित्र अपघात

 

Related Posts