IMPIMP

Child Artist Rahul Koli Passed Away | 10 वर्षीय ‘या’ प्रसिद्ध बालकलाकाराचे कर्करोगाने निधन

by nagesh
Child Artist Rahul Koli Passed Away | this famous child artist passed away

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन चित्रपट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजराती ‘छेल्लो शो’ (‘Chello Show’) या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणारा अभिनेता राहुल कोळीचे निधन (Child Artist Rahul Koli Passed Away) झाले आहे. हा चित्रपट यंदा भारताकडून ऑस्करसाठी (Oscars) पाठवण्यात आला आहे. अभिनेता राहुल कोळीचे वय अवघे 10 वर्षे होते. राहुलच्या निधनाने (Child Artist Rahul Koli Passed Away) अनेकांना मोठा धक्काच बसला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राहुल कोळी हा गेल्या काही दिवसांपासून कर्करोगाशी (Cancer) झुंज देत होता. अखेर शेवटी कर्करोगाशी असणारा त्याचा लढा अपयशी ठरला आणि त्याची प्राणज्योत मावळली. गेल्या काही दिवसांपासून राहुलला सतत ताप येत होता. तसेच त्याला रक्ताच्या उलट्याही होत होत्या अशी माहिती राहुल कोळीच्या वडिलांनी दिली आहे. राहुलचा एक खास चित्रपट तीन दिवसांनी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र, त्या अगोदरच राहुलची प्राणज्योत मावळली (Pass Away) आहे. राहुलच्या अशा अचानक जाण्याने त्याचा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

 

राहुलने अवघ्या 10 वर्षांमध्ये बालकलाकार म्हणून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली.
राहुलने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. राहुलच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राहुलचा चित्रपट 14 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Child Artist Rahul Koli Passed Away | this famous child artist passed away

 

हे देखील वाचा :

Pune Crime | रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने INS शिवाजीतील कर्मचार्‍याने महिलेला घातला 6 लाखांना गंडा

Amit Shah | पश्चिम महाराष्ट्रात भाजपकडून राजकीय फेरबांधणी, अमित शहांचा कोल्हापूर दौरा

MCA Election | मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत चुरस, संदीप पाटील यांचे आशिष शेलार-पवारांना थेट आव्हान

 

Related Posts