IMPIMP

Aryan Khan Cruise Case | आर्यन खान प्रकरणी समीर वानखेडेंवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल, सीबीआयची छापेमारे

by nagesh
Aryan Khan Cruise Case cbi registers corruption case against aryan khan case former ncb officer officer sameer wankhede cbi raids at 29 places including mumbai

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Aryan Khan Cruise Case | कॉर्डेलिया क्रूझवर (Cordelia Cruise) बॉलीवुड अभिनेता शाहरुख खान (Bollywood
Actor Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान याला कथित ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतले होते. यानंतर तत्कालीन एनसीबी अधिकारी समीर
वानखेडे (NCB Officer Sameer Wankhede) आणि इतर तिघांनी 25 कोटी रुपये मागितल्या प्रकरणी सीबीआयने (CBI) गुन्हा (FIR) दाखल केला
आहे. दरम्यान आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील (Aryan Khan Cruise Case) दोन तपासी अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वी निलंबित केले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

गुन्हा दाखल केल्यानतंर सीबीआयने वानखेडे यांच्या मालमत्तांसह देशभरात 29 ठिकाणी छापे मारले (CBI Raid) आहेत. सीबीआयने मुंबई, रांची, दिल्ली आणि कानपूर (उत्तर प्रदेश) येथे छापेमारी केली आहे. सीबीआयने आयआरएस (Indian Revenue Service) अधिकारी समीर वानखेडे यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचा (Corruption) गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या घराची, अन्य ठिकाणांची झडती घेतली जात आहे. वानखेडे हे पूर्वी एनसीबीचे (मुंबई झोन) संचालक होते.

 

 

समीर वानखेडे आणि इतर चार जणांवर आर्यन खान कथित ड्रग्ज प्रकरणात (Aryan Khan Cruise Case) शाहरुख खानकडून 25 कोटींची लाच मागितल्याचा (Demand a Bribe) आरोप करण्यात आला आहे. त्यांनी 25 लाख रुपये उकळल्याचेही आरोपांमध्ये म्हटले आहे. या प्रकरणात वानखेडे यांच्यासह एनसीबीचे आणखी दोन माजी अधिकारी आणि दोन खासगी व्यक्ती आरोपी आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Aryan Khan Cruise Case cbi registers corruption case against aryan khan case former ncb officer officer sameer wankhede cbi raids at 29 places including mumbai

 

हे देखील वाचा :

Chitra Wagh | ‘उद्धवजी, ज्या दिवशी तुम्ही राजीनामा दिला त्याच दिवशी महाविकास आघाडीचा पोपट मेला, कायद्याची भाषा समजत नसेल तर…’

Nana Patole on Ajit Pawar | अजित पवारांच्या आरोपांना नाना पटोलेंचे प्रत्युत्तर, म्हणाले-‘अजित पवार खोटं बोलत आहेत, राजिनाम्याची कल्पना…’

Devendra Fadnavis | परमबीर सिंह यांचं निलंबन मागे, फडणवीस म्हणाले…. (व्हिडिओ)

 

Related Posts