IMPIMP

Ashish Shelar on Shivsena | आशिष शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल; म्हणाले – ‘राणे, राणा दिसतात; मग शेख, पठाण दिसत नाहीत का ?’

by nagesh
BJP On Shivsena | mumbai bjp president ashish shelar criticism of shivsena uddhav thackeray

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Ashish Shelar on Shivsena | मागील अनेक दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात आरोप प्रत्यारोपांचा धुरळा उडत आहे. अशातच आता भाजपचे आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. “राणे, राणा, कंबोज, राणावत यांना महापालिकेकडून घरं तोडण्यासाठी नोटीस दिल्या जात आहेत. गेल्या पंचवीस वर्षात खान, पठाण, शेख यांनी अनधिकृत बांधकाम केलं नाही का ? हा जाती, धर्मभेद नाही; तर अनधिकृत बांधकामावर कारवाईची मागणी आहे,’ असं शेलार यांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना आशिष शेलार म्हणाले की, ”राज्यातील पोलीस हनुमान भक्तांना, हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना पकडण्यासाठी निघालं आहे आणि केंद्रातील पोलीस दाऊदच्या हस्तकांना पकडायला निघालं आहे. हा फरक राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी सरकारच्या कामकाजातील आहे,” अशी टीका त्यांनी केली. (Ashish Shelar on Shivsena)

 

पुढे आशिष शेलार म्हणाले, ”शाहीन बाग आणि जहांगीरपुरीमध्ये आम्ही बुलडोझर बघितले. हे दिल्लीच्या महापालिकेचं काम आहे. पण गेल्या 25 वर्षात नागपाडा, मोहम्मद अली रोड, शेजारी असलेल्या बेहरामपाडा इथे सत्ताधारी शिवसेनेने कधीच बुलडोझर नेला नाही, हा फरक आहे. तसेच, आडनावावरुन कारवाया केल्या जात आहेत, असा आरोप यावेळी शेलार यांनी केला. सरकारने असा भेद करु नये,” असंही ते म्हणाले.

 

”बेहरामपाडा दिसत नाही आणि शाहीन बागवर कारवाई केल्यावर आरडाओरड करता.
राणे दिसतात पण शेख, पठाण दिसत नाहीत. ते अनधिकृत नाहीत असं म्हणायचं आहे का ? आम्ही कोणाच्या विरोधात नाही पण अनधिकृत बांधकामावरील कारवाई आडनावं बघून केली जात आहे.” असा आरोप त्यांनी केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Ashish Shelar on Shivsena | bjp mla ashish shelar shivsena bmc illegal construction in mumbai

 

हे देखील वाचा :

Satara Crime | खळबळजनक ! घराबाहेर झोपलेल्या तरुणाचा झोपतेच चिरला गळा

MP OBC Political Reservation | महाराष्ट्रानंतर मध्‍य प्रदेश सरकारलाही ‘सुप्रीम’ झटका ! पंचायत निवडणुकांची अधिसूचना 2 आठवड्यात काढण्याचे SC चे निर्देश

Sanjay Raut on Kirit Somaiya | संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर घणाघात; म्हणाले – ‘महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करायला निघालेलेच सर्वात भ्रष्ट’

 

Related Posts