IMPIMP

Ashish Shelar | राहुल गांधींचे विधान म्हणजे बेअक्कलपणा – आशिष शेलार

by nagesh
BJP MLA Ashish Shelar | ashish shelar criticized mahavikas aghadi including shivsena after mumbai blast threatening call

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – काँग्रेस (Congress) नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) पायी कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत जात आहे. सध्या ही यात्रा महाराष्ट्रात चालत आहे. एका ठिकाणी भाषणात राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी भाष्य केले होते. त्यावरुन राज्यातील राजकारण तापले आहे. भाजप राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक झाली आहे. भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राहुल गांधींवर कठोर शब्दांत टीका केली आहे. राहुल गांधी यांचा भारताचा अभ्यास नाही, त्यामुळे त्यांचे विधान बेअक्कलपणाचे आहे, असे आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी सावरकरांबद्दल लिहितात, सावरकर भारताचे सुपुत्र आहेत. त्यांचा उल्लेख त्या वीर सावरकर म्हणून करतात. ज्या वीर या शब्दावर स्वत: राहुल गांधी भाषणामध्ये ताशेरे ओढण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्या आजीचे पत्र वाचलेले नाही का? पुढे इंदिरा गांधी म्हणतात, सावरकरांचे युद्ध अतिशय धाडसी होते.
ब्रिटिश सरकारच्या विरोधातील युद्धाची त्यांची नोंद इतिहासात होईल, असे कार्य सावरकरांनी केले आहे. राहुल गांधी यांना हा इतिहास माहीत नाही. त्यामुळे ते अशी बेताल वक्तव्ये आणि विधाने करत असल्याचे शेलार म्हणाले.

 

तसेच पुढे शेलार म्हणाले, राहुल गांधी यांनी नेहरुंना वाचलेले नाही. इंदिरा गांधींचा अभ्यास केलेला नाही.
आता केरळमधून निवडून आल्यानंतर हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मते येवढेच ते बघत आहेत.
म्हणून त्यांचे विधान म्हणजे बेअक्कलपणा आहे. तसेच राहुल गांधींचा आम्ही निषेध करतो.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Ashish Shelar | rahul gandhis statement is nonsense ashish shelar

 

हे देखील वाचा :

Sapna Chaudhary | सपना चौधरीचा डान्स पाहून लोकांनी स्टेजवर फेकल्या बाटल्या, मध्येच सोडावा लागला शो

Pune Pimpri Crime | हातचालाखीने ATM काढून घेत वृद्धाची 85 हजारांची फसवणूक, तळेगाव दाभाडे मधील प्रकार

Suicide attempt at Ministry | प्रियसीला न्याय मिळावा म्हणून तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

 

Related Posts