IMPIMP

Ashtavinayak Darshan | गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! आता हेलिकॉप्टरने अष्टविनायक दर्शन केवळ 5 तासात

by nagesh
Ashtavinayak Darshan | devotees ashtavinayaks visit by helicopter in just five hours pune news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनगणेशभक्त अष्टविनायक गणपती दर्शन (Ashtavinayak Darshan) हे श्रद्धा म्हणून 24 तासात पूर्ण करतात. मात्र, ज्या गणेश भक्तांकडे वेळ कमी आहे, अशा व्हीआयपी भक्तांसाठी अष्टविनायक गणपतींचे दर्शन (Ashtavinayak Darshan) हेलिकॉप्टरद्वारे (Helicopter) केवळ पाच तासांत करता येणार आहे. तर सर्वसामान्य भक्तांसाठी वातानुकूलित बसद्वारे (Air-Conditioned Bus) व्हीआयपी दर्शनाचा (VIP Darshan) उपक्रम अष्टविनायकातील मुख्य स्थान असलेल्या श्री क्षेत्र ओझर (Shri Kshetra Ojhar) येथील विघ्नहर गणपती देवस्थानच्या (Vighnahar Ganpati Devasthan) वतीने सर्व विश्वस्त व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन राबविणार असल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष गणेश कवडे (Ganesh Kavade) यांनी दिली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

गणेश कवडे यांनी माहिती देताना सांगितले की, या उपक्रमासाठी प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठी देवस्थानचे आठ व्यक्ती प्रयत्न करीत आहेत. ओझर देवस्थानकडून यासाठी (Ashtavinayak Darshan) भाडेकरारावर हेलिकॉप्टर घेणार आहे. अष्टविनायक मधील सर्व देवस्थानाबरोबर संपर्क झाला असून हेलिकॉप्टरच्या प्रवासासाठी सर्व प्रशासकीय मान्यता (Administrative Approval) मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

 

असा असेल प्रवास
ओझर येथून विघ्नहर्त्या गणपतीचे दर्शन घेऊन तीर्थयात्रेला प्रारंभ होईल. रांजणगाव Ranjangaon (महागणपती – Mahaganapati) यांच्याबरोबर संपर्क साधला असून, सिद्धटेक Siddhatek (सिद्धिविनायक – Siddhivinayak), थेऊर Theur (चिंतामणी – Chintamani), मोरगाव Morgaon (मयूरेश्वर – Mayureshwar), महाड Mahad (वरदविनायक – Varadavinayak), पाली Pali (बल्लाळेश्वर -Ballaleshwar) व शेवटी लेण्याद्रीच्या (Lenyadri) गिरीजात्मज (Girijatmaj) गणपतीचे दर्शन झाल्यानंतर वातानुकूलित बसद्वारे भाविकांना ओझर येथे आणण्यात येणार आहे.

 

भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था
अष्टविनायक यात्रा बुकिंग करणाऱ्या भाविकांना ओझर या ठिकाणी तीर्थयात्रेच्या आदल्या दिवशी व्हीआयपी भक्त भवनामध्ये मुक्काम, तसेच महाप्रसाद व्यवस्था करण्यात येणार आहे. सकाळी 6.30 वाजता श्रींना भाविकांच्या हस्ते महाभिषेक करण्यात येईल. भाविक 8 वाजता तीर्थयात्रेला हेलिकॉप्टरने रवाना होतील. दुपारी एक वाजता लेण्याद्री या ठिकाणी यात्रा पूर्ण करतील. गिरीजात्मकाचे दर्शन झाल्यानंतर बसद्वारे ओझर येथे आल्यानंतर तीर्थयात्रेची सांगता होईल.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दर्शनासाठी वातानुकूलित बसची सोय
सर्वसामान्य गणेश भक्तांना देखील वातानुकूलित बसद्वारे अष्टविनायक दर्शन घडविण्याचा देवस्थानचा मानस आहे.
या भाविकांना श्रींचे दर्शन घेताना रांगेत दर्शन घ्यावे लागणार नाही.
तीर्थयात्रा करणाऱ्या भाविकांना थेट दर्शन व्यवस्था करण्यात येणार आहे.
तसेच या भाविकांना देखील तीर्थयात्रेच्या अगोदरच्या दिवशी मुक्काम, महाप्रसाद, दर्शन, अभिषेक व्यवस्था करण्यात येणार आहे.

 

Web Title :- Ashtavinayak Darshan | devotees ashtavinayaks visit by helicopter in just five hours pune news

 

हे देखील वाचा :

‘या’ सरकारी विमा योजनेच्या विमाधारकांनाही असेल, LIC च्या IPO मध्ये सवलतीचा अधिकार

Post Office MIS | मंथली इन्कम स्कीममध्ये पती-पत्नी मिळून उघडू शकतात अकाऊंट, 4950 रु. होईल दरमहिना इन्कम

Kirit Somaiya | किरीट सोमय्यांचा दावा, म्हणाले – ‘मुख्यमंत्र्यांनी माझ्या अटकेचे आदेश मुंबई पोलिसांना दिले’

 

Related Posts