IMPIMP

Bacchu Kadu | रवी राणांनी 1 नोव्हेंबरपर्यंत मी 50 खोके घेतल्याचे पुरावे नाही दिले, तर आम्ही… – बच्चू कडूंचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना इशारा

by nagesh
MLA Ravi Rana | mla ravi rana criticized bachchu kadu on dispute maharashtra news

अमरावती :  सरकारसत्ता ऑनलाइन अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील
कटुता संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. दोघे एकमेकावर आरोप आणि कुरघोड्या करत असतात. यात आश्चर्याची बाब म्हणजे दोघेही भाजपचे पाठीराखे
आहेत. आता बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी त्यांच्यावर राणांनी केलेल्या आरोपांचे पुरावे देण्याचे आव्हान केले आहे. अन्यथा आपण मोठा निर्णय घेऊ,
असे कडू म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बच्चू कडू हे गुवाहाटीला गेलेल्या आमदारांपैकी आहेत. त्यामुळे त्यांनी 50 खोके घेतले आहेत, असा आरोप आणि दावा रवी राणा यांनी केला होता. त्यावर बच्चू कडू फार दुखावले आहेत. आता त्यांनी रवी राणा यांना मैदानात खेचत आव्हान केले आहे. 1 नोव्हेंबरपर्यंत रवी राणा यांनी मी पैसे घेतल्याचे पुरावे सादर करावेत, नाहीतर मी योग्य तो निर्णय घेणार आहे. आठ ते दहा आमदार आपल्या संपर्कात असल्याचे यावेळी कडूंनी (Bacchu Kadu) सांगितले.

 

बुधवारी बच्चू कडू यांनी नागपूरात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना जनतेसमोर येऊन स्पष्टता करण्याचे आवाहन केले आहे.
50 खोक्यांचा आरोप आमच्यावर विरोधकांकडून होत आहे. ते आम्ही सहन केले.
पण, आता आमच्यासोबत सत्तेत असलेले आमदाराच आमच्यावर आरोप करु लागले, तर त्यामुळे जनतेत चुकीचा संदेश जात आहे.
राणांच्या विधानामुळे शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देणारे इतर आमदार देखील दुखावले आहेत.
आम्ही आठ ते दहा आमदार बसून प्रहारच्या राज्यभरातील कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहोत.
1 नोव्हेंबर पर्यंत राणांनी माफी मागतली नाही किंवा त्यांनी संबंधित आरोपांचे पुरावे दिले नाहीत,
तर आम्ही वेगळा निर्णय घेणार आहोत, असे कडू म्हणाले.

 

मी स्वबळावर चार वेळा आमदार झालो. राणांना चार पक्षांचा पाठिंबा घ्यावा लागतो.
त्यामुळे आता आमच्या अस्तित्वाचा प्रश्न तयार झाला आहे. मला खोटे आरोप करुन शांत करायचे.
माझ्या विरोधात राज्य आणि केंद्र सरकारची मदत घेऊन षडयंत्र आखायचे काम राणा करत आहेत.
माझ्याकडे त्यासंबंधी एक व्हिडिओ क्लीप आहे. येत्या चार दिवसांत मी ती उघड करणार आहे, असे देखील कडू म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bacchu Kadu | Bacchu Kadu challenge to ravi rana is to provide proof of the accusation of taking the money at guwahati

 

हे देखील वाचा :

Shahajibapu Patil | 1999 चा किस्सा सांगत शहाजीबापू पाटील यांची शरद पवारांवर टीका, म्हणाले- ‘त्या’ गोष्टीचे शल्य आयुष्यभर बोचत राहील’

MLA Prasad Lad | अरविंद केजरीवाल एक नंबरचे नौटंकीबाज मुख्यमंत्री, नोटांवर लक्ष्मी व गणपती छापण्याच्या मागणीवर प्रसाद लाड यांचे टीकास्त्र

Gulabrao Patil | हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, आदित्य ठाकरे अडीच वर्षात किती जिल्ह्यांमध्ये फिरले?, गुलाबराव पाटील यांचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

 

Related Posts