IMPIMP

Shahajibapu Patil | 1999 चा किस्सा सांगत शहाजीबापू पाटील यांची शरद पवारांवर टीका, म्हणाले- ‘त्या’ गोष्टीचे शल्य आयुष्यभर बोचत राहील’

by nagesh
Shahajibapu Patil | balasahebanchi shivsena shinde group mla shahji bapu patil again criticised ncp sharad pawar over not supporting in bad days

सांगोला : सरकारसत्ता ऑनलाइन   शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांना महाराष्ट्रात कोण ओळखत नाही? त्यांनी गुवाहाटीचे जे वर्णन
केले, ते कोणत्याही साहित्यिकाने केले नसेल. तसेच शहाजीबापू पाटील आणखी एका करणासाठी प्रसिद्ध आहेत. ते म्हणजे राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष
शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करण्यासाठी. शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) यांनी आता 1999 मधील एक आठवण सांगत
शरद पवारांवर टीका केली आहे.

 

सोलापूरमधील एका आयोजित कार्यक्रमात बोलताना शहाजीबापू पाटील (Shahajibapu Patil) म्हणाले, जनतेची सेवा हीच भगवंताची सेवा, असे मी आजवर मानत आलो आहे. सन 1999 साली माझा विधानसभेत पराभव झाला. या पराभवाचे दु:ख मला किती झाले, हे या मतदारसंघातील जनताच सांगेल. माझ्या पत्नीला एक नवी साडी देखील मिळत नव्हती. 19 वर्षे सातत्याने घरात गरिबी होती. परंतु मी जनतेचे प्रश्न सोडविण्यात कुठेही कमी पडलो नाही. राजकारणाच्या चढाओढीत मला माझी संपत्ती देखील विकावी लागली. त्याचे मला दु:ख नाही. मात्र, माझ्या गरिबीच्या काळात मी ज्या पक्षाचा कार्यकर्ता होतो त्या पक्षाचे शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) कुठे होते?, असा प्रश्न शहाजीबापू पाटील यांनी केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

माझ्या गरिबीच्या काळात मी पक्षाचा कार्यकर्ता असूनही शरद पवार आणि अजित पवार माझ्यासोबत नव्हते.
या गोष्टीचे शल्य मला आयुष्यभर बोचत राहील.

 

शहाजीबापू पाटील यांनी गुवाहाटीतून आपल्या एका कार्यकर्त्यांला फोन केला असता,
ते म्हणाले होते, माझ्या पत्नीला मला एक साडी देखील घेता आली नाही.
त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून शहाजीबापू पाटील यांच्या पत्नीला एक साडी भेट पाठविण्यात आली होती.
त्यावर प्रतिक्रिया देताना बापू म्हणाले, मी ती साडी घेतली नाही. कारण माझी जेव्हा हालाखीची परिस्थिती होती, तेव्हा कोणीही माझ्यासोबत नव्हते.

 

Web Title :- Shahajibapu Patil | balasahebanchi shivsena shinde group mla shahji bapu patil again criticised ncp sharad pawar over not supporting in bad days

 

हे देखील वाचा :

MLA Prasad Lad | अरविंद केजरीवाल एक नंबरचे नौटंकीबाज मुख्यमंत्री, नोटांवर लक्ष्मी व गणपती छापण्याच्या मागणीवर प्रसाद लाड यांचे टीकास्त्र

Gulabrao Patil | हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, आदित्य ठाकरे अडीच वर्षात किती जिल्ह्यांमध्ये फिरले?, गुलाबराव पाटील यांचे विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर

NCP MLA Nilesh Lanke | राज्याचे पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचे असतील, निलेश लंके यांचे सूचक विधान

 

Related Posts