IMPIMP

Bacchu Kadu Reaction On Ravi Rana | मुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी करूनही बच्चू कडू – रवी राणांमधील वाद मिटला नाही?

by nagesh
MLA Ravi Rana | mla ravi rana criticized bachchu kadu on dispute maharashtra news

सरकारसत्ता ऑनलाईन – Bacchu Kadu Reaction On Ravi Rana | आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे काही दिसत नाहीये. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मध्यस्थी करून देखील काही उपयोग झाला नाही. राणा यांनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी कडूंनी मात्र वाद मिटल्याचे जाहीर केले नाही. उलट कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आपली भूमिका स्पष्ट करू असे त्यांनी म्हटले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

काय आहे प्रकरण?

गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडू यांनी 50 खोके घेतले होते, असा आरोप राणा यांनी केला होता. यावरून कडू आणि राणा यांच्यात चांगलाच वाद सुरू झाला. शेवटी हा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर राणा यांनी आपले वक्तव्य मागे घेत दिलगिरीही व्यक्त केली परंतू कडू यांनी मात्र वाद मिटल्याचे अद्याप जाहीर केले नाही. त्यांनी सांगितले की, खरंतर वाद व्हायला नको होता. वाद राणा यांनी सुरू केला. आरोप झाल्यानंतर जर मी गप्प बसलो असतो तर लोकांनी मला बदनाम केले असते.

 

त्यामुळे प्रत्युत्तर दिलं. असो. या वादात मी माझे आयुष्य घालवणार नाही.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी हे प्रकरण चांगले हाताळले. मी त्यांचे आभार मानतो.
पण मला कार्यकर्ते ही महत्वाचे आहेत. त्यांच्या सोबत संध्याकाळी बैठक घेणार आहे.
त्यानंतर पुढील निर्णय घेणर आहे. याशिवाय मंगळवारी दुपारीही कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे.
त्यात आपली भूमिका जाहीर करणार असल्याचे कडू यांनी म्हंटले आहे.
आता कडू काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Bacchu Kadu Reaction On Ravi Rana | bacchu kadu reaction on ravi rana cm eknath shinde bjp devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Raj Thackeray | पंतप्रधान देशाचे हवेत, राज्याचे नकोत – राज ठाकरे

Sharad Pawar | शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड, ब्रीच कँन्डी रुग्णालयात दाखल

Devendra Fadnavis | पुणे जिल्हयातील 450 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पाला केंद्राकडून मंजुरी, 5000 युवकांना मिळणार रोजगार; फडणवीसांनी ट्विट करून दिली माहिती

 

Related Posts