IMPIMP

Sharad Pawar | शरद पवार यांच्या प्रकृतीत बिघाड, ब्रीच कँन्डी रुग्णालयात दाखल

by nagesh
Sharad Pawar | sharad pawar comment on himachal pradesh and gujarat assembly election 2022 result

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रकृतीत बिघाड झाला असून, त्यांना ब्रीच कँन्डी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजी गर्जे (Shivaji Garje) यांच्याकडून पत्रक काढून ही माहिती देण्यात आली. यात शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती ठीक नसल्याचे म्हंटले आहे. डॉक्टारांच्या सल्ल्यानुसार पुढील तीन दिवस ते रुग्णालयात उपचार घेणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शरद पवार यांनी तीन दिवस रुग्णालयात दाखल करुन घेतल्यामुळे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात राहण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ब्रीच कँडी रुग्णालयाच्या (Breach Candy Hospital) आवारात गर्दी करु नये, असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर शरद पवार ३ नोव्हेंबर रोजी शिर्डीत सभा घेणार आहेत. त्यानंतर ४ व ५ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय शिबीर देखील होणार आहे. त्याला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. (Sharad Pawar)

 

गेल्यावर्षी शरद पवार यांच्यावर याच रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली होती.
पोटदुखीच्या त्रासाने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांच्या पोटात पित्ताशयाचे खडे तयार झाले होते. त्यामुळे त्यांच्या पोटात दुखत होते.
यावेळी त्यांच्यावर एन्डोस्कोपीद्वारे शस्त्रक्रिया करुन खडे काढण्यात आले होते.

 

 

Web Title :- Sharad Pawar | ncp chief sharad pawar admitted in breach candy hospital mumbai due to health problem

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | पुणे जिल्हयातील 450 कोटींच्या इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्पाला केंद्राकडून मंजुरी, 5000 युवकांना मिळणार रोजगार; फडणवीसांनी ट्विट करून दिली माहिती

Cholesterol Control | थंडीत वाढले कोलेस्ट्रॉल तर ‘या’ 5 हेल्दी फॅट फूड्सने करा कंट्रोल

Supreme Court (SC) Bans Two Finger Test | बलात्कार पीडितेवर होणारी ‘टू फिंगर टेस्ट’वर घातली बंदी! सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

 

Related Posts